प्रतिनिधी - सुजित मैड
लोणंद - लोणंद येथील राज्यस्तरीय 'शरद कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन आज दि.०२ रोजी बारामती ग्रोचे सर्वसर्वा राजेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) जिल्हाध्यक्ष सुनिल माने, प्रा. विक्रम कड, सुजाताताई यादव, आयोजक डॉक्टर नितीन सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. कृषि प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना राजेंद्र पवार यांनी शेतकऱ्यांना भविष्यातील एआय टेक्नॉलॉजिसाठी तयार रहाण्यास सांगितले. भविष्यातील शेती ही एआयच्या माध्यमातून कमी खर्चिक व अधिक उत्पन्न देणारी असणार आहे. अजून ती नवी असलीतरी लवकरच ती सर्वसामान्यांपर्यंत
पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच यावेळेस पुढे बोलताना लोणंद सारख्या छोट्या शहरात शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान पोहोचवण्याचे मोठे काम डॉक्टर नितीन सावंत करत असल्याचे गौरवोद्वार राजेंद्र पवार यांनी काढले. डॉक्टर नितीन सावंत यांनी आपल्या मनोगतात बोलताना शरद कृषि महोत्सवाचे हे सहावे वर्ष असल्याचे सांगत शरद पवार यांच्या प्रेरणेतून सुरू केलेल्या या उपक्रमातून प्रत्येक वर्षी शेतीतील अधुनिक प्रयोग, वेगवेगळे शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अवगत व्हावे यासाठी 'शरद कृषि महोत्सवाच्या माध्यमातून प्रयत्न करत असल्याचे सांगत 'कृषिक' हे शेतकऱ्यांसाठी एक माईलस्टोन असून कृषि महोत्सव कसा असावा हे बारामतीच्या केव्हीकेला जाऊन लाईव्ह डेमो बघून आल्याशिवाय शेतीसाठी काय काम केलेय
याचा प्रत्यय येत नसल्याचे सांगितले. त्यानंतर डॉक्टर नितीन सावंत विचारमंचकडून राजेंद्र पवार यांचा सन्मान करण्यात आला तर शरद कृषिरत्न पुरस्काराने चीकफीड कंपनीचे सतीश कोंडे यांना व शरद कृषि उद्योजक या पुरस्काराने केबी इंटरनॅशनलचे सचिन यादव यांचा राजेंद्र पवार यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आला. यावेळेस हात्मा फुल फुले कृषि विद्यापीठाचे प्रा. विक्रम कड, अजित यादव, केके गायकवाड, राजेश शिंदे, रघुनाथ शेळके, नंदकुमार मोरे, महेंद्र गाढवे, संभाजीराव शिंदे, किसन धायगुडे, स्वप्निल क्षीरसागर, शुभदा सावंत, सुजाता यादव, हेमलता निंबाळकर, शैलजा खरात, लता नरूटे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ते गिरीश बनकर यांनी प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनमोहनदास खुडे यांनी केले तर प्रा. रघुनाथ शेळके यांनी आभार प्रदर्शन केले.


No comments:
Post a Comment