
वडकी / राळेगाव ( नरेश राऊत ) : राळेगाव तालुक्यातील चिखली (वनोजा) येथील जिल्हा परिषद शाळेला एक अतिरिक्त शिक्षक मिळावा यासाठी लोकेश दिवे यांच्या यांच्या नेतृत्वात चिखली ग्रामवासी यांनी गटशिक्षण अधिकारी राळेगाव यांना निवेदन दिले.
जिल्हा परीषद प्राथमीक शाळा चिखली (व) येथे १ ते ७वर्ग असुन मुलांची पटसंख्या १८ असून एकच शिक्षक रुजू आहे व एकच शिक्षक असल्यामुळे त्यांना प्रशासकीय कामाचा व्याप असल्यामुळे विद्याथर्याना शिक्षणापासुन वंचीत रहावे लागत आहे. एक शिक्षक सर्व वर्गाना सांभाळू शकत नाही किंवा विध्यार्थ्यांवर दुर्लक्ष होताना दिसुन येते. तेव्हा लहान मुलांना / विध्यार्थ्यांना उच्च व योग्य शिक्षण मिळावे म्हणुन उच्च प्राथमीक शाळा चिखली( व ) येथे एक अतीरीक्त शिक्षण देण्यात यावे. व विदयार्थाच्या होणान्या शैक्षणीक नुकसान थांबवावे अशा मागणीचे निवेदन लोकेश दिवे यांच्या नेतृत्वात चिखली ग्रामवासी यांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती रायगाव यांना दिले.
युवा कौशल्य विभागामार्फत निवड झालेल्या एका शिक्षकांची चिखली ( व) शाळेला निवड करावी . अन्यथा अतिरिक्त शिक्षकाविना आमच्या गावातील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर जाईल. वरिल गंभीर बाबीची दखल घेऊन अतिरिक्त शिक्षक देण्यात यावे अन्यथा सर्व विध्यार्थ्यांना घेऊन आम्ही सर्व पालक येत्या आठ दिवसात आंदोलन करणार असा विनंती वजा इशारा निवेदनाद्वारे गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आला. तेव्हा या गंभीर बाबीची दखल घेऊन चिखली वनवा शाळेला अतिरिक्त शिक्षक द्यावे असे निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी लोकेश दिवे,स्वप्नील ठाकरे, रोशन येडमे,विष्णू चव्हाण, प्रशांत सोनटक्के,साहिल वनकर, क्षितिज घायवटे इतर चिखली येथील नागरिक उपस्थित होते.




No comments:
Post a Comment