न्हावरे येथील भजनी मंडळाची पंढरपूर मंदिरात भजन सेवा - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Monday, February 3, 2025

न्हावरे येथील भजनी मंडळाची पंढरपूर मंदिरात भजन सेवा

 न्हावरे येथील भजनी मंडळाची पंढरपूर मंदिरात भजन सेवा



प्रतिनिधी सुजित मैड

न्हावरे - न्हावरे येथील श्री. मल्लिकार्जुन भजनी मंडळाची श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात भजन सेवा संपन्न झाली ही सेवा करण्याचा मान प्रथमच मिळाल्यामुळे न्हावरे पंचक्रोशीतून वारकरी ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे. ज्या विठ्ठलाच्या नामस्मरणात गेली अनेक वर्षांपासून येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिरात हरिपाठ, दरसोमवार व  एकादशी निमित्त भजन तसेच अंखड हरिनाम सप्ताह सोहळा आदी. विविध धार्मिक कार्यक्रमात श्री.मल्लिकार्जुन भजनी मंडळ कायमच अग्रेसर असते. ज्याच्या नावाने आपण परंपरागत भजन गात आहे. अशा सावळ्या विठ्ठलाच्या मूर्तीपुढे  पंढरपुर नगरीत भजन गावे अशी वारकऱ्यांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मनोकामना होती. यासाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानला सुचविल्याने न्हावरेकर भजनी मंडळाला माघ महिन्यात हि संधी मिळाली.

माजी उपसरपंच संभाजीराव बिडगर,राधिकाताई जगताप, चंद्रकांत साठे, संजय गायकवाड, अनिल कोरेकर,  बाळासाहेब वेताळ काळूराम कोरेकर, तात्या बिडगर, राहूल गायकवाड, पांडूरंग बिडगर, दत्तात्रय वेताळ आदी. वारकऱ्यांनी भजनसेवेचा आनंद घेतला.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here