प्रतिनिधी - सुजित मैड
राशीन - राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राशीन येथील जगदंबा देवी मंदिरात मंगळवार पासून (दि.४) शतचंडी यज्ञ सोहळ्यास सुरुवात होणार आहे. सात दिवस चालणाऱ्या या सोहळ्याचा समारोप मंगळवारी (दि.११) होमहवन व पूर्णाहुती सोहळा करून होणार आहे. या सोहळ्यादरम्यान जगदंबा देवीला दोन किलो सोन्याचा मुखवटा बसविण्यात येणार आहे.
सात दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात सकाळी श्री जगदंबा देवी महापूजा व सप्तशतिपाठ, सप्तशती प्राकृत पाठ (देवीमहात्म्य मराठी) दुपारी देवी भागवत कथा, सायंकाळी श्री जगदंबा देवी सामुदायिक आरती यासह राज्यभरातील नामांकित महाराजांची कीर्तने, व्याख्याने, देवीचा जागर गोंधळ, भारुडे, शाहिरी, पोवाडे, देवी महात्म कथा, लोकगीते, नाचू कीर्तनाचे रंगी आदींसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.११) दोन किलो सोन्याचा नूतन सुवर्ण मुखवटा जगदंबा देवीस बसविण्यात येणार आहे.


No comments:
Post a Comment