राहुल सोलापूरकरचं आता बाबासाहेबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, आव्हाड संतापले, म्हणाले त्याला जोड्यानं मारा... - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Sunday, February 9, 2025

राहुल सोलापूरकरचं आता बाबासाहेबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, आव्हाड संतापले, म्हणाले त्याला जोड्यानं मारा...


छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात अभिनेता राहुल सोलापूरकर याने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं. औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी लाच दिली होती, असं विधान अभिनेता राहुल सोलापूरकर याने केलं होतं. यानंतर सर्व स्थरातून संताप व्यक्त करण्यात आला, दरम्यान हा वाद ताजा असतानाच आता राहुल सोलापूरकर याने आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

वेदांनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणच होते, असा जावई शोध राहुल सोलापूरकर याने लावला आहे. सोलापूरकर याने नवीन वादग्रस्त विधान करून पुन्हा एक वाद ओढवून घेतला आहे. राहुल सोलापूरकर याच्या या विधानानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत सोलापूरकरच्या या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

नेमके काय म्हणाले आव्हाड?

राहुल सोलापूरकरने आता सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. हा जिथे दिसेल तिथेच त्याला जोड्याने मारायला हवा. याच्यासारख्या मनुवाद्यांनीच महाराष्ट्राचे, देशाचे वाटोळे केले आहे. 

राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितलेली नाही. आता तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बोलून सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. याच्या डोक्यावर नसलेले केस उगवावे लागतील; ते कसे उगवायचे, ते बहुजन अन् आंबेडकरवादी ठरवतील. या मनुवाद्यांनाच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा का त्रास होतो, हेच समजत नाही. याला दिसेल तिथे तुडवा !! असं द्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here