राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत सणसवाडीच्या जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्राने पटकावला दुसरा क्रमांक - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 4, 2025

राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत सणसवाडीच्या जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्राने पटकावला दुसरा क्रमांक





प्रतिनिधी - रिजवान बागवान

       सणसवाडी - सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ अकलूज यांच्या वतीने सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या १०७ व्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या भव्य दिव्य राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील सणसवाडी येथील जय अंबिका सांस्कृतिक कलाकेंद्राने दुसरा क्रमांक पटकावला आहे.

         संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून १० कला केंद्रांनी या भव्य राज्यस्तरीय लावणी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता.त्यामध्ये सणसवाडी ता.शिरूर येथील जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्राच्या शितल-पूजा भूमकर या पार्टीच्या लावण्यवतींनी आपली चुणूक दाखवून सणसवाडी गावासह जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्राचे नाव उज्वल केले आहे.

             अकलूज जि.सोलापुर येथे दरवर्षी भव्य राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन केले जाते.मागच्या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये सणसवाडी येथील जय अंबिका कला केंद्रातील वैशाली समसापूरकर या पार्टीने प्रथम क्रमाकांचे पारितोषिक पटकावले होते.दोन ते तीन दिवस चाललेल्या या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत यंदा चालू वर्षी सणसवाडी येथील जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्रातील शितल-पूजा भूमकर व रेश्मा-वर्षा परितेकर या दोन पार्ट्यांच्या लावणयवतींनी सहभाग नोंदवला होता.

                 यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंञी विजयसिंह मोहिते पाटील,समितीचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील,सौ.सुलक्षणादेवी जयसिंह मोहिते पाटील,आमदार दिलीप सोपल,सिने अभिनेञी सुरेखा कुडची,अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील,प्रताप क्रिडा मंडळाच्या अध्यक्षा कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील,सहकारमहर्षी लावणी पुरस्कार विजेत्या वैशाली जाधव,जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्राच्या संचालिका सुरेखाताई पवार,प्रमिला लोदगेकर,बरखाताई जळगावकर,रेश्मा परितेकर आदि मान्यवर मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

                          


               शितल-पूजा भुमकर या पार्टीने राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला असुन दोन लाखांचे बक्षीस मिळवले आहे.यामध्ये प्रामुख्याने पुजा काळे भूमकर,शितल काळे भूमकर,नम्रता काळे,वनिता शिंदे,ज्योती लाखे,रेश्मा शेख,सारिका जाधव,गिता बनसोडे,उमा काळे,भक्ती मुसळे,संध्या चंदन,प्रतिक्षा वाघमारे,वैष्णवी मुसळे,तबलावादक सुनिल जावळेकर,ढोलकीवादक सुमित कुडाळकर,पेटीवादक सुरदास कुडाळकर,बालाजी अंधारे,कैलास सरोज आदिंनी विशेष कामगिरी केली आहे

सणसवाडीच्या जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्रात शितल-पूजा भूमकर पार्टीतील कलावंतांचा पेढे भरून सन्मान 

     २०२५ च्या अकलूज येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत सणसवाडीच्या जय अंबिका कला केंद्राच्या शितल-पूजा भूमकर पार्टीने दुसरा क्रमांक पटकावुन २ लाख रूपयाचे बक्षिस व पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल सुरेखाताई पवार यांच्यावतीने पेढे भरून सर्व लावण्यवतीसह कलाकार बंधू भगिनींचा सन्मान करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here