शिरूर : शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे भीमा नदीच्या काठावर असलेल्या भीमाशंकर स्मशानभूमीजवळ अज्ञात चोरट्याने २५,००० रुपये किमतीच्या तांब्याच्या तारांची चोरी केली आहे.
ही घटना २० फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून २१ फेब्रुवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान घडली. महादेव नाथू असवले (वय ५६, रा. कामठे वाडी, रांजणगाव सांडस) यांच्या तक्रारीनुसार, चोरट्याने त्यांच्या आणि साक्षीदारांच्या एकूण पाच इलेक्ट्रिक मोटारी फोडून मोठे नुकसान केले व त्यातून ५० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्या.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय बनकर करत असून प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे कार्यरत आहेत.
पोलीस अधिक तपास करत असून परिसरात अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







No comments:
Post a Comment