पारंपारिक शिवकालीन युद्ध कला मर्दानी खेळ स्पर्धेत टाकळी हाजी चे विद्यार्थी चमकले! - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Sunday, February 9, 2025

पारंपारिक शिवकालीन युद्ध कला मर्दानी खेळ स्पर्धेत टाकळी हाजी चे विद्यार्थी चमकले!


 टाकळी हाजी( शिरूर) प्रतिनिधीः शौकत मुजावर 

पारंपारिक शिवकालीन युद्ध कला मर्दानी खेळ स्पर्धेत मृत्युंजय फाईट क्लब टाकळी हाजी येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या कलागुणांची चुणूक दाखवत पालक उपस्थित मान्यवर प्रेक्षक यांची मने जिंकली.ही स्पर्धा जगप्रसिद्ध रांजण खळगे कुंड पर्यटन क्षेत्र निघोज - टाकळी हाजी येथे दि.९फेब्रुवारी २०२५ रोजी शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण केंद्रमार्फत भरविण्यात आली होती.यामध्ये असंख्य स्पर्धकांनी सहभाग नोदवला होता. 

मा.बापूसाहेब गावडे विद्यालय टाकळी हाजी येथील विद्यार्थी कु.सार्थक धोंडीभाऊ जाधव,सोहम दत्तात्रय गावडे यांनी ११/१२ वय गटात प्रथम क्रमांक प्राप्त करत सुवर्णपदक मिळविले.मुलींच्या १५/१७ वर्ष मुलींच्या वयोगटात


 कु.तनिशा शौकत मुजावर,मिजबा शौकत मुजावर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करत सुवर्णपदक प्राप्त केले.जि.प.प्राथ शाळा मांडव ओहोळ वस्ती येथील कु.माहीन शौकत मुजावर हिने लहान गटात प्रथम क्रमांक प्राप्त करत सुवर्णपदक प्राप्त केले.जि.प.प्राथ शाळा उचाळे वस्ती येथील तेजस प्रवीण पोकळे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करत सुवर्णपदक प्राप्त केले.पोतदार इंटरनॅशनल स्कूल शिरूर मध्ये शिकणारे विद्यार्थी कु.पिन्सी प्रशांत चोरे वय वर्षे६ मुलींच्या गटात प्रथम क्रमाक सुवर्ण पदक मिळवले तर मुलांच्या वय वर्ष६ मध्ये धैर्यशील प्रशांत चौरे यांने दुसरा क्रमांक मिळवत सिल्वहर पदक प्राप्त करत आपली चुनूक दाखवली.या विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण कराटे,लाठी काठी प्रशिक्षण पत्रकार शौकत मुजावर यांनी दिले.

या सर्व विद्यार्थ्याना द युवा ग्रामीण पत्रकार महाराष्ट्र अध्यक्ष अन्सार शेख,सचिव विवेकानंद फंड,पुणे जिल्हा अध्यक्ष शकील मनियार, पत्रकार साहेबराव लोंखडे,आरुण कुमार मोटे,

माजी आमदार पोपटराव गावडे,सुनीताताई गावडे,सरपंच आरुणाताई दामू आण्णा घोडे, मृत्युंजय फाईट क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद फुलसुंदर, मृत्युंजय प्रतिष्ठाण/ हॉटेल विश्व पॅलेस उदयोग समुहाचे पै.तुकाराम उचाळे,प्रा.आर. बी.गावडे,आजीत गावडे सर,युवा उद्योजक प्रशांत चोरे,धोडीभाऊ जाधव,प्रवीण पोकळे,बाळू चादर, शालेय शिक्षक,ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.





No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here