पारनेर प्रतिनिधी - अरुण बेलकर
शिर्डी - सहकार विभाग राज्य पतसंस्था फेडरेशन, मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशन यांच्यावतीने शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजित करण्यात आले होते. या परिषदेसाठी आठ देश सात राज्यांतील सहकार क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आम्ही परिषदेने सहकाराचा प्रतीकात्मक वृक्षाला पाणी घालण्याचे काम केले आहे. सहकारातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी निर्मळ मनाने फार मोठी शक्ती असलेल्या पतसंस्था चळवळीला सदृढ करण्याचे आवाहन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ जी बागडे साहेब यांनी केले. सहकार निबंधकांनी संस्थांमधील त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
पतसंस्थानी अधिक ठेवी व अधिक व्याजदर यावर भर न देता ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षिततेवर भर द्यावा. ठेवीदारांना सुरक्षेची हमी द्यावी कर्जदारांच्या आर्थिक शिस्तीवर लक्ष द्यावे. सहकार परिषदेसाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण जी विखे पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, पारनेर ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन, पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार काशिनाथ महादू दाते सर. सहकार परिषदेचे आयोजक काका कोयटे. मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनचे सुरेश वाबळे बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक रिझर्व बँक चे संचालक सतीश मराठे सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी सहकार विभागाचे अप्पर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर असोसिएशन एशियन कॉन्फिडरेशन क्रेडिट युनियन चे मुख्य कार्यकारी अधिकारी हेतियाराची . यांच्यासह देश विदेशातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






No comments:
Post a Comment