परागीकरण होत नसल्याने बीज उत्पादनात घट - डॉ. अमोल विरकर - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 1, 2025

परागीकरण होत नसल्याने बीज उत्पादनात घट - डॉ. अमोल विरकर


पिंपळगाव,ता. मालेगाव : विषारी कीटकनाशकांच्या आनिर्बंध वापरामुळे मधमाशांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मधमाशा परागीभवनासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र पिकांवर वारंवार विषारी मात्रा फवारल्या जात असल्यामुळे मधमाशांचा मृत्यू होत आहे. यामुळे त्यांची संख्या घटली आहे त्याचा थेट परिणाम कांदा बियाणे उत्पादनावर झाला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. 

विषारी कीटकनाशकांमुळे मधमाशांचा मृत्यू: कांदा उत्पादकांमध्ये चिंता शेतीमध्ये विषारी कीटकनाशकांचा अनिर्बंध वापर हे मधमाशांच्या हा घटत्या संख्येचे प्रमुख कारण ठरले आहे. कीटकनाशकांमुळे मधमाशांच्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो, ज्यामुळे त्या मरतात. शेतीसाठी जमिनीचा वापर वाढल्यामुळे मधमाशांच्या नैसर्गिक अधिवासाचा नाश झाला आहे. मधमाशांच्या कमतरतेमुळे कांदा बियाने उत्पादनात मोठी घट झाली आहे. कांदा बियाणांचा दर्जाही घटला आहे. कांदा बियाने उत्पादनात घट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक मोठे नुकसान झाले आहे. तसेच पर्यावरणावरही गंभीर परिणाम होऊ शकतो , असे मत उद्यानविद्या विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अमोल विरकर यांचे मत आहे. मालेगाव तालुक्यात तयार होणारे कांदा बियाणे हे उच्च दर्जाचे असते. या बियानांपासून तयार होणारा कांदा मोठा आकर्षक आणि टिकाऊ असतो. कांदा लागवडीसाठी आवश्यक असलेले हवामान आणि जमीन मालेगाव तालुक्यात उपलब्ध आहे व त्या जमिनीत कांद्यासारखे पीक हे  शेतकऱ्यांचे सफरचंद म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे या तालुक्यात कांद्याचे उत्पादन घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे व जवळच मोठी बाजारपेठ म्हणून लासलगाव हे गाव भारतात प्रसिद्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळतो, म्हणून येथील शेतकऱ्यांना जास्त लांब जाण्याची गरज भासत नाही व वाहतुकीमध्ये हा कांदा खराब होत नाही. त्याचा फायदा शेतकऱ्याला होतो. यातील शेतकरी कांदा लागवडीमध्ये अनुभवी आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च दर्जाचा कांदा बियाणे तयार करतात. येथील शेतकरी आधुनिक व पारंपारिक दोन्ही पद्धती वापरून कांदा उत्पादन करतात. त्यामुळे चांगल्या दर्जाचा कांदा व बियाणे मिळण्यास मदत होते. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होत आहे. असे प्रतिपादन डॉ. अमोल विरकर यांनी केले. 

एक पीक पद्धतही कारणीभूत : 

हवामान बदलामुळे मधमाशांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. एक पीक पद्धतीदेखील कारणीभूत ठरली आहे. शेतकरी एकाच प्रकारचे पीक घेत असल्यामुळे मधमाशांना आवश्यक असणारे विविध प्रकारचा फुलोरा उपलब्ध होत नाही

- डॉ. अमोल विरकर ( शास्त्रज्ञ, छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल, काष्टी, मालेगाव) 


मधमाशांची संख्या कमी झाल्यामुळे कांदा बियाणे उत्पादनात मोठी गट झाली आहे.  यामुळे कांदा बीज घेणे कठीण झाले आहे. शासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी. 

-श्री. प्रवीण पवार (शेतकरी, पिंपळगाव)


एकत्रित प्रयत्नांची गरज : 

मधमाशांची घटती संख्या ही एक गंभीर समस्या आहे. यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. शेतकरी व शासनाने एकत्रितपणे प्रयत्न करून मधमाशांचे संवर्धन करणे आवश्यक आहे

- डॉ. शुभांगी देवकर (शास्त्रज्ञ, छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल, काष्टी, मालेगाव)



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here