गरीब शेतकऱ्यांना दुग्ध व्यावसायास प्रोत्सहान देणार : श्री. दिलीप सोदक - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 8, 2025

गरीब शेतकऱ्यांना दुग्ध व्यावसायास प्रोत्सहान देणार : श्री. दिलीप सोदक

टाकळी हाजी (शेख शौकत मुजावर) : गरीब कुंटूबांत वाढलेला परिस्थितीशी कष्ठ, चिकाटी, जिद्दीच्या जोरावर मात देत शेतकऱ्यांचे दुःख जाणुन घेत त्यांची आर्थिक परिस्थिती सुधरावी म्हणून शेती सह जोडधंदा दुध व्यावसायास प्रोत्सहान देणारे शांताई उदयोग समुहाचे संस्थापक दिलीप शेठ सोदक टाकळी हाजी बेट भागातील यशस्वी उद्योजक तसेच असंख्य शेतकऱ्यांना दुग्धव्यावसायाच्या माध्यमातुन रोजगार उपलब्ध करूण देत. सामाजिक कार्य, धार्मिक कार्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत बनलेले श्री.दिलीपशेठ सोदक हे नाव नेहमीच चर्चीले जात आहे.
शेतकरी कुंटुंबातील घरची परिस्थिती जेमतेम कोरडवाहू शेती कुठलाही आर्थिक आधार नाही,शेतीतून उत्पन्न नाही,मार्ग सुचेना रोजनदारी नाही, अंगात कष्ठ करण्याची उमेद आसणाऱ्या या औलीयाने शेतीसह दुग्धव्यावसाय करण्याचा निर्णय घेतला दुध सायकलवर घेवून जाणे,गुरांचे खादय विकत, डोक्यावर जनावराचे गवत वाहत दुग्ध व्यावसायास प्राधान्य देत होते. काळानुसार बेट भागाचा विकास होवू लागला, नदीवर बंधारे होवू लागले आणि या भागातील सर्वसामान्य शेतकरी बागायतदार झाला.ऊस,कांदे,शेतात पिके घेवू लागला शेतकऱ्यांची परिस्थिती बदलू लागली शेतकरी दुग्ध जनावरे पाळू लागले. दुग्ध व्यावसायाशी नाळ जोडलेल्या दिलीपशेठ सोदक यांच्या जनसंपर्कामुळे त्यांच्या डेरी व्यावसायाला गति मिळाली. व्यावसायासाठी भांडवल तसेच वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला . वेळेप्रसंगी कर्ज काढून त्यांनी शेतकऱ्याच्या घरुण दुध 


वाहतुकीस तीन चाकी पॅगो विकत घेतल्या . शेतकऱ्यांना दुधाळ जनावरे खरेदी करण्यास आर्थिक मदत करत दुधाच्या रकमेतून दिलेली रक्कम ग्यायची युक्ती सुचवली त्यामुळे दुध व्यावसायाला गति मिळाली पूर्ण व्यावसायात जोखून देत स्वतः दुधाचे कॅड धुणे, टॅकर भरण्याचे काम करू लागले या कामात पत्नी सह मुलेही मदत करू लागली. घरच्यांची साथ लाभल्याने अंगात शंभर हत्तीचे बळ संचारत या औलियाने आपली परिस्थिती बदलली. दुग्ध व्यावसायिक शेतकरी यांची आडचण ओळखून त्यांनी पशुखादय तयार करण्याचा निर्णय घेत खादय कारखाना तयार करत जनावरांसाठी भुसा,पेंड ,सरकी खादय बनवून आपल्या गवळ्यांन च्या जनावरांना घरपोच पुरवण्याचे काम सुरु केले यात ते यशस्वी झाले.आज ते असंख्य कामगारांना रोजनदारी देत आहेत. त्यांचा  जीवनप्रवास खडतर आसला तरी कष्ट,जिद्द,चिकाटी,व्यावहार ज्ञान, यामुळे ते यशस्वी उद्योजक बनले आसुन शांताई उदयोग समुह आज प्रगतीपथावर आहे,धाडस केल्याशिवाय या जगात काहीच मिळत नाही हे त्यांनी दाखवून दिले.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here