गुरुवर्य सतिश राजहंस हे खेलरत्न पुरस्काराने होणार सन्मानित. - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Saturday, July 5, 2025

गुरुवर्य सतिश राजहंस हे खेलरत्न पुरस्काराने होणार सन्मानित.


टाकळी हाजी ( शेख शौकत मुजावर) : द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत सामाजिक, शैक्षणिक, शिक्षक, सांस्कृतिक, कृषी, सहकार, उदयोग, वैदकीय, प्रशासकीय,पत्रकारिता, कला, साहित्य, क्रिडा, पर्यावरण, ग्रामविकास आदी क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या कार्याची दखल घेवून त्यांना राज्यस्तरीय  पुरस्कार अतिथी मान्यवराच्या हस्ते देवून सन्मानित करत गुणगौरव केला जातो.


क्रिडा क्षेत्रातील या वर्षीचा राज्यस्तरीय पुरस्कार चऱ्होली पुणे येथील क्रिडा क्षेत्रातील महागुरू आदरणीय सतिश दिंगबर राजहंस यांना बहाल होणार असून त्यांनी कराटे, किकबॉक्सिंग खेळाच्या माध्यमातून अनेक खेळाडू घडवून देशाला अनेक पदके मिळवून देण्याचे काम करत आसून ते स्वतः उत्तम प्रशिक्षक मार्गदर्शक तसेच इंडियाचे नावजलेले कोच आसून अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धानमध्ये त्यांनी देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे.
ग्रामीण भागातील खेळाडू हा देशपातळी वर चमकावा म्हणून त्यांनी किकबॉक्सिग खेळात प्राविण्य मिळवत ग्रामीण खेळाडूंना प्रशिक्षित केले असून ते किकबॉक्सिंग स्पोर्टस असो. पुणे जिल्हाअध्यक्ष पदी विराजमान आहेत. त्यांनी अनेक स्पर्धाचे आयोजन करत हसरा स्वभाव, शांत भाव, समोरच्यांची मने जिकण्याची कला,उत्तम नियोजन,या गुणांनमुळे ते खेळाडूंच्या गळ्यातील ताईत बनले आहे. स्वसंरक्षण कलेत आपल्या मुली शिवानी, श्रावणी यांना पारंगत करून आंतराष्ट्रीय पंच बनवले आसून कन्यारत्न हे अनमोल आहे मुलगा मुलगी असा भेदभाव न करत मुलींना उच्चशिक्षणासह खेल जगतात त्यांच्या पंखांना बळ देत आहेत.बेटी बचाओ बेटी पढाओ असा संदेश देत खेळ क्षेत्रात आपले वर्चस्व स्थापित केले आहे.
त्यांच्या कार्याची दखल द युवा ग्रामीण पत्रकार संघाने घेत त्यांना क्रिडा क्षेत्रातील आदर्श प्रशिक्षक /खेल रत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार घोषीत होताच वाको इंडिया /किक बॉक्सिंग स्पोर्टस असो. महाराष्ट्र अध्यक्ष निलेश शेलार, पुणे शहराअध्यक्ष रुपेश परदेशी, ग्रामीण उपाध्यक्ष प्रतिक नेवसे महाराष्ट्रातील खेळाडू, नावाजलेले पंच तसेच प्रशिक्षक यांनी शुभेच्छाचा वर्षाव करत आहेत.
त्यांच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांचे खेळाडू वर्गाकडून स्वागत केले जात आहे.









No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here