जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्रजी माध्यम शाळा,वनोजा येथे योगदिन सर्वांगसुंदर साजरा - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 24, 2025

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्रजी माध्यम शाळा,वनोजा येथे योगदिन सर्वांगसुंदर साजरा

 (मुख्याध्यापिका यांच्या स्त्युत उपक्रमात योगदिन साजरा)
राळेगाव / यवतमाळ (बंडु भारसकरे) :- पंचायत समिती राळेगांव अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्रजी माध्यम शाळा,वनोजा येथे  योगदिन"सर्वांगसुंदर "साजरा करण्यात आला,योगदिनाला वनोजा शाळेतील वर्ग १ ते ८ च्या चिमुकल्यांनी 
हजेरी लावली आणि त्याना मुख्याध्यापिका सविता उईके आणि विषय शिक्षक मेश्राम सर व भोयर सर यांनी विद्यार्थ्यांना योग आणि प्राणायाम या विषयी माहिती दिली,सर्व विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना गणवेष, पुस्तक,बुट व साॅक्स वाटप करण्यात आले.योगा व प्राणायाम झाल्यानंतर विद्यार्थ्यांना बर्फी देण्यात आली नंतर पुस्तक वाटप करण्यात 
आले,दीर्घ विश्रांती मध्ये भरपूर स्वादिष्ट मुंगदाळ खिचडी व राजगिरा लाडू देण्यात आला.कार्यक्रमाला पालक व पदाधिकारी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्री.मोरेश्वरजी वटाणे व सदस्य मा.श्री.मारोती सोनटक्के व मा.श्री.ओमप्रकाशजी उगेमुगे हजर 
होते.मुख्याध्यापिका व पदविधर शिक्षिका सौ.सविता उईके(मुख्याध्यापक)श्री.मेश्राम सर (स.अ.),श्री.भोयर सर (पदविधर शिक्षक) आणि पदाधिकारी शाळेत हजर होते,अशाप्रकारे योग दिन वनोजा शाळेत सर्वांगसुंदर साजरा करण्यात आला.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here