राळेगाव मतदार संघात युवा बेरोजगार तरुणांसाठी नवीन उद्योग सुरू करणार प्रसिद्ध उद्योगपती दिलीप सोनटक्के यांचे आश्वासन - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Sunday, July 20, 2025

राळेगाव मतदार संघात युवा बेरोजगार तरुणांसाठी नवीन उद्योग सुरू करणार प्रसिद्ध उद्योगपती दिलीप सोनटक्के यांचे आश्वासन

राळेगाव (नरेश राऊत): राळेगाव:-प्रसिद्ध उद्योगपती दिलीप सोनटक्के यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील पुलगाव तालुक्यातील विरुळ या गावी झाला, त्यांनी अत्यंत गरिब परिस्थितीतून त्यांनी नागपूर येथे शिक्षण घेतले आणि उच्च शिक्षण मुंबई व बेंगलोर येथे झाले.प्रसिध्द उद्योगपती त्यांनी तीस वर्षा 
आधी अमेरिकेत गेले आहे,काही काळ नागपूर येथे वास्तव्यास होते नागपूर येथे व्हाईट हाऊस पँलेस नावाने प्रसिद्ध असलेला बंगला आहे त्यांना प्रसिद्ध उद्योगपती म्हणून ओळखल्या जाते, यावेळी राळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड.अल्पेश देशमुख,संदीप पेंदोर भाजप कार्यकर्त, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळु धूमाळ यांनी सदिच्छा भेट घेऊन राळेगाव मतदार संघात तरूण व युवा बेरोजगार लोकांसाठी आमच्या ही मतदार संघात एखाद्या 

उद्योग निर्माण करावा अशी विनंती प्रसिद्ध उद्योगपती दिलीप सोनटक्के यांना करण्यात आली व प्रसिद्ध उद्योगपती त्यानी ‌सुद्धा राळेगाव मतदार संघात उद्योग निर्माण करण्याचे आश्वासन दिले व लवकरच मी राळेगाव येथे भेट देऊन राळेगाव येथे भरपूर असा मोठा उद्योग निर्माण करिल असे आश्वासन दिले यावेळी कार्यकर्त्यांनी राळेगाव मतदार संघासाठी सूवर्णभेट होईल अशी विनंती केली.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here