शिरूर प्रतिनिधी सुनिल काटे.
ध्यास मला लागला वैशू तुझा या अल्बम गीताचे चित्रीकरण नादीक फिल्म प्रॉडक्शन या बॅनरखाली
शिरूर व कोल्हेवाडी या भागात पूर्ण झाली असून हे अल्बम गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या गीताचे चित्रीकरण हे एक दिवसात पूर्ण करण्यात आले असून व्हिडिओग्राफी गौरव बोरकर व सुहास गायकवाड यांनी अगदी कमी वेळेत पूर्ण केले असून या गीताचे दिग्दर्शक नागेश पवार व सह दिग्दर्शक राजू धावडे यांनी केले असून या गीता मध्ये मुख्य भूमिकेत अभिनेते अक्षय वेताळ व नागेश पवार यांनी मुख्य भूमिकेत तर अभिनेत्री काजल सोनवणे यांनी आपली मुख्य भूमिका बजावली असून बाल कलाकार तेजस्विनी चव्हाण हिने ही अगदी लहान वयात या गीत मध्ये काम करण्याची संधी मिळाली तसेच सह कलाकार राजू धावडे भरत घावटे गौरव
बोरकर रेणुका खाडे वंजाताई धावडे यांनी ही या गीता मध्ये आपली भूमिका निभावली असून या गीताच्या चित्रीकरणासाठी कोल्हेवाडी ग्रामस्थ व रामदास धावडे यांचे चित्रीकरणा वेळी विशेष सहकार्य लाभले लवकरच हे गीत प्रेक्षकांच्या भेटीला नादीक फिल्म प्रोडक्शन घेऊन येत आहे नक्कीच हे गीत प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल असे मत नादीक फिल्म प्रोडक्शन यांनी व्यक्त केले.


No comments:
Post a Comment