झेप फाऊंडेशन पुणे (महाराष्ट्र राज्य) शिरूर तालुका उपाध्यक्षपदी अक्षय वेताळ व कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर वायदंडे यांची निवड. - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Saturday, December 10, 2022

झेप फाऊंडेशन पुणे (महाराष्ट्र राज्य) शिरूर तालुका उपाध्यक्षपदी अक्षय वेताळ व कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर वायदंडे यांची निवड.

शिरूर प्रतिनिधी : सुनिल काटे
 झेप फाऊंडेशनच्या शिरूर तालुका उपाध्यक्षपदी अक्षय वेताळ व कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर वायदंडे यांची निवड करण्यात आली झेप फाऊंडेशन पुणे ही एक सामाजिक बांधिलकी जपत  आतापर्यंत फाऊंडेशन  खूप समाजकार्य केले आहे .दिवाळीमध्ये कात्रज पुणे येथील पुना जेरियट्रिक केअर सेंटर येथे दिवाळी फराळाचे वाटप केले व वृद्ध आजी-आजोबा यांच्या बरोबर वेळ घालवला त्यांना दिवाळीमध्ये एकटेपणा वाटू नये म्हणून त्यांच्याबरोबर काही वेळ घालवून दिवाळी साजरी केली तसेच पंढरपूरला पायी  चालत जाणाऱ्या वारकऱ्यांना फळे, व फराळाचे वाटप केले. १७ नोव्हेंबर रोजी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने सरकारने २० मुलापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता त्याच्या विरोधात मराठी शाळा वाचवण्यासाठी भिडे वाडा ते शिवनेरी किल्ल्यापर्यंत १०० किलोमीटर धावत शिक्षण ज्योतकाढण्यात आली त्यामध्ये झेप फाउंडेशनचा सहभाग होता .झेप फाउंडेशनचे उद्दिष्ट समाजातील गोरगरीब व वृद्ध व अनाथ मुलांसाठी व झाडे लावा झाडे जगवा यासाठी काम करते तसेच कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य,समाजसेवा, स्त्री संरक्षण, या क्षेत्रासाठी समाजामध्ये जनजागृती ची कामे करते. समाजातील जेष्ठ नागरिकांना एकत्र आणणे त्यांचे दैनंदिन जीवन सुखा समाधानने व्यतीत करण्यासाठी मदत करणे, त्यांचे आरोग्य विषयक प्रश्न सोडवण्यासाठी उपयुक्त सल्ला देणे, परस्पर विचार विनिमय करणे, जेष्ठाच्या  विविध समस्या संबंधी व्याख्याने,परिसंवाद ,चर्चासत्रे, संमेलन आयोजित करणे. वाचनालय, विरुळा केंद्र, वद्राश्रम स्थापन करणे, मनोरंजनाचे कार्यक्रम योजने ,ज्येष्ठ नागरिक संघ बनवणे, सरकारकडील जेष्ठ नागरिकांच्या ज्या काही योजना असतील ते मिळवून देण्याचा प्रयत्न करणे.याप्रमाणे अनेक कामे आहेत जी समाज उपयोगी असतील त्यामध्ये झेप फाऊंडेशन सहभाग व अग्रेसर आहे.फाऊंडेशन मार्फत समाजाच्या विविध घटकांना सुध्दा वेळोवेळी मदत केली जाते. तसेच अन्नदान हेच सर्व श्रेष्ठ दान समजून या माध्यमातून देखील फाऊंडेशन काम करते.असे विविध उपक्रम फाऊंडेशन मार्फत सुरू आहे. भविष्यात फाऊंडेशन चे काम अधिक चांगले व फाऊंडेशन चा प्रत्येक विश्वस्त हा फाऊंडेशन च्या प्रमुख पदी असावा या उद्देशाने  झेप फाऊंडेशन पुणे च्या सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर व गोरगरीब वंचितांची जाण असणारे तडफदार सामाजिक कार्यकर्ते संस्थापक/ अध्यक्ष कांता भाऊ राठोड झेप फाउंडेशन पुणे यांच्यामार्फत समाजकार्याची आवड असणाऱ्या अक्षय वेताळ शिरूर तालुका उपाध्यक्षपदी  व कार्य अध्यक्षपदी ज्ञानेश्वर वायदंडे याची निवड करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here