शिरूर : एकीकडे लोकांनी आपल्याला दिलेलं देवपण नैतिकता आणि ईमान बाजूला ठेवून करण्यात येणारी डॉक्टरकी, आणि दुसरीकडे आपण समाजाचं देणं लागतो या भावनेतून रुग्णांना अगदी मोफत दिली जाणारी सेवा असेही चित्र पहावयास मिळते, हेच चित्र पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव येथील माणसातील देव डॉ विशाल खळदकर सर यांच्या निरामय हॉस्पिटल मध्ये पहावयास मिळाले. शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा गावातील सायली कांबळे या मतिमंद मुलीच्या अंडाशयातील गाठीचे उपचार करण्यासाठी जवळजवळ 3लाख रुपये खर्च सांगितला होता. ही गोष्ट प्रहार जनशक्ती पक्ष शिरूर तालुका उपाध्यक्ष श्री सिद्धार्थ नाना गायकवाड यांना समजताच त्यांनी सायलीच्या कुटुंबाची भेट घेऊन आधार देवून काळजी करू नका माणसातील देव डॉ विशाल खळदकर सर नक्कीच यावर उपाय सांगतील म्हणून डॉ. विशाल खळदकर यांच्याशी संपर्क साधला असता गरिबांचे कैवारी पेशंट कडे पैसे नसतानाही प्रथम उपचार करण्यास प्राधान्य देणाऱ्या डॉ.विशाल खळदकर यांनी सदर मुलीची जटिल शस्त्रक्रिया लोकनेते जाणता राजा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त डी. के. खळदकर फाऊंडेशन मार्फत मोफत करण्याचे आश्वासन दिले. दिनांक 12 डिसेंबर रोजी सायली वरील जटिल शस्त्रक्रिया निरामय हॉस्पिटल केडगाव येथे यशस्वीरीत्या पार पडली. शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी डॉ.विशाल खळदकर, डॉ. संजीव करंडे, डॉ. परात मुनोत, डॉ. गायत्री शेळके यांनी प्रयत्न केले. मतिमंद सायली वरील सर्व 3 लाख रुपयांचा खर्च डी. के. खळदकर फाऊंडेशन कडून करण्यात आला. सायली वरील यशस्वी शस्त्रक्रिया व मोफत उपचार याबद्दल तिच्या कुटुंबाने माणसातील देव डॉ विशाल खळदकर व प्रहार जनशक्ती पक्ष शिरूर तालुका उपाध्यक्ष श्री सिद्धार्थ नाना गायकवाड यांचे आभार मानले. डॉ.विशाल खळदकर यांनी केलेल्या या सामाजिक कार्याबद्दल शिरूर तालुका, दौंड तालुक्यातील पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.
प्रहार जनशक्ती उपाध्यक्ष श्री सिद्धार्थ नाना गायकवाड यांच्या प्रयत्नातून वाचला 3 लाख रुपयांचा खर्च

No comments:
Post a Comment