श्री राहुलदादा करपे पाटील स्पेशल फाउंडेशन च्या वतीने ह.भ.प. गिरी महाराज यांच्या शुभहस्ते ग्रामस्थांना भगवत गीतेचे वाटप करण्यात आले. - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Wednesday, December 14, 2022

श्री राहुलदादा करपे पाटील स्पेशल फाउंडेशन च्या वतीने ह.भ.प. गिरी महाराज यांच्या शुभहस्ते ग्रामस्थांना भगवत गीतेचे वाटप करण्यात आले.

शिरूर प्रतिनिधी: ज्ञानेश्वर वायदंडे

तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख..!! पाहीन श्रीमुख आवडीने..!!

सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ति.रखुमाईच्या पती सोयरिया.आलेगाव पागा या ठिकाणी  ४१ वा अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने आज दि.१३/१२/२०२२ रोजी ह.भ.प.श्री.पांडुरंग महाराज गिरी (नाशिक)..यांची कीर्तन रुपी सेवा संपन्न झाली...याप्रसंगी योगीराज उद्योग समूहाचे चेअरमन व भावी जिल्हा परिषद सदस्य श्री.राहुलदादा करपे पा.यांनी उपस्थित राहून कीर्तन रुपी सेवेचा आनंद घेतला..किर्तन सेवा संपल्यानंतर श्री.राहुलदादा करपे पाटील सोशल फाउंडेशन च्या वतीने व ह.भ.प.गिरी महाराज यांच्या शुभहस्ते ग्रामस्थांना "भगवत गीतेचे"वाटप करण्यात आले..तसेच चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाला संबोधित केले..अशाच प्रकारे भक्तीमय वातावरणामध्ये यापुढेही अखंड हरिनाम सप्ताह चालू राहील असा आशावाद व्यक्त केला...यावेळी मोठ्या संख्येने आलेगाव पागा व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here