कृषि विभागाच्या वतीने निर्वी येथे शिवार फेरी. - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Friday, December 2, 2022

कृषि विभागाच्या वतीने निर्वी येथे शिवार फेरी.


निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार
निर्वी ( ता. शिरूर) दि.२
कृषी विभागाच्या वतीने निर्वी ता शिरूर येथे पाचट जाळू नका अभियानाला प्रतिसाद मिळावा व महत्व पटावे म्हणून आज कृषी सहायक जयवंत भगत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवार फेरी काढण्यात आली प्रकाश वाळूंज यांच्या शेतात पाचट कुटी करून खोडके छाटुन ठेवलेल्या प्लॉटची पाहणी करण्यात आली पाचट कुटी करून पाचट व्यवस्थापन केल्याने अनेक शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे निर्वी परिसरात पाचट व्यवस्थापन करून जमिन सुपिकता सह खोडवा उत्पादन वाढीवर कल मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहे
शिवार फेरी साठी रोहीदास धुमाळ जितेंद्र धुमाळ सागर काटे शरद पवार मोहनराव सोनवणे सागर पवार निलेश सोनवणे दत्तात्रय सोनवणे बाळासाहेब सोनवणे इत्यादि शेतकरी उपस्थित होते प्रकाश वाळूंज यांनी ५ एकरावर तसेच सागर काटे यांनी १ एकरावर सागर पवार यांनी १ एकर निलेश सोनवणे यांनी २ एकर निलेश सोनवणे मेजर यांनी ४ एकर पाचट व्यवस्थापन केले आहे शिवार फेरीत पाचट व्यवस्थापनचे महत्व बाबत चर्चा करण्यात आली शेवार फेरीत निलेश सोनवणे सागर पवार सागर काटे यांच्या ही प्रक्षेत्रात पाहणी करण्यात आली सागर पवार यांचा खोडवा ऊस फक्त पाचट कुटी करून तयार झालेल्या खतावर आला आहे असे हि सांगितले ऊस पाचटाचा फायदा परिसरात झाल्याने कृषी सहायक जयवंत भगत यांनी समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here