शिरूर तालुक्यातील दहिवडी येथे अज्ञात माथेफिरू व्यक्तीने पेटवले सहा जणांचे ऊस. - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Sunday, December 4, 2022

शिरूर तालुक्यातील दहिवडी येथे अज्ञात माथेफिरू व्यक्तीने पेटवले सहा जणांचे ऊस.

शिरूर प्रतिनिधी: ज्ञानेश्वर वायदंडे

दहिवडी तालुका शिरूर येथे आज दुपारी अज्ञात माथे फिरू व्यक्तीने जवळपास साडेतीन एकर ऊस अज्ञात व्यक्तीने पेटून  दिला सर्व ग्रामस्थांनी ऊसामध्ये  अज्ञात व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न केला परंतु तो फरार होण्यास यशस्वी झाला यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामध्ये अज्ञात व्यक्तीने दुपारच्या वेळेला अर्ध्या तासाच्या अंतरावरती एक सलग सहा जणांचे ऊस पेटवून फरार झाला दहिवडी व मांजरे वस्ती वरील सर्व ग्रामस्थांनी व तरुण युवकांनी ऊसाला लागलेली आग विझवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले या नुस्कान ग्रस्त शेतकऱ्यांमध्ये श्री माणिक चव्हाण, सिताराम मांजरे आप्पा, बाप्पू मांजरे, रोहिदास दौंडकर, रामभाऊ दौंडकर, या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आग विझवण्यासाठी सचिन लवांडे, विकास गारगोटे, विशाल गारगोटे, राहुल मांजरे, अनिल मांजरे, सचिन मांजरे,संतोष मुळीक,धनंजय गायकवाड, देविदास दौंडकर, राहुल लवांडे, अविनाश मांजरे,संतोष गायकवाड, देविदास गारगोटे, सोनू मांजरे, या युवकांनी मोलाचे सहकार्य केले नुसकानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here