साबळेवाडी येथे लम्हाण बाबा महाराज यांच्या यात्रेनिमित्ताने काठीचे भव्य मिरवणूक - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Tuesday, January 10, 2023

साबळेवाडी येथे लम्हाण बाबा महाराज यांच्या यात्रेनिमित्ताने काठीचे भव्य मिरवणूक


निर्वी प्रतिनिधी-शकील मणियार

साबळेवाडी(ता- शिरूर) येते लम्हाण बाबा महाराज यात्रेच्या निमित्ताने काठीची सनई ताफेच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या मिरवणुकीमध्ये भाविकांनी हजेरी लावलेली होती प्रसिद्ध बालेशा सनई ताफा निर्वीकर यांनी आपली कला सादर केली गेल्या अनेक वर्षापासून काठीची मिरवणूक काढण्यात येत असते लम्हाणबाबा महाराज हे एक प्रसिद्ध जागृत देवस्थान आहे नवसाला पावणारे जागृत ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे बाबांना अनेक लोक नवसही करतात आणि पूर्णही होतो असे अनेक भाविकांचीश्रद्धा आहे गबाजी साबळे यांनी सांगितले की मी एक बाबांना नवस केला होता आणि तो नवस माझा पूर्णही झाला मला बाबांचा आशीर्वादामुळे माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झाले आणि माझ्या मुलांना चांगल्या प्रकारे नोकरीही मिळाली आज माझी तिन्ही मुलं पोलीस खात्यामध्ये नोकरी करत आहे माझी बाबांवरती अपार श्रद्धा आहे माझे आता जे काही ते सर्व लम्हाणबाबा महाराज यांच्यामुळे आहे यात्रेनिमित्ताने सकाळी 9.00ते11.00 काठी हळदीचा कार्यक्रम तसेच दुपारी 2.00ते5.00वा काठीची भव्य मिरवणूक काढण्यात आली संध्याकाळी 5.00ते8.00वा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लक्ष्मण सोनासाबळे गबाजी सोना साबळे किशोर गबाजी साबळे रेखा गबाजी साबळे(मुंबई पोलीस) कविता गबाजी साबळे(येरवडा जेल पोलीस) शुभम गबाजी साबळे खंडू गावडे विठ्ठल साबळे(चेअरमन) विलास साबळे(ग्रा प सदस्य) बबन साबळे(संचालक) पांडुरंग पवार(मुंबई पोलीस) गोविंद माने स्वप्निल कालेकर भालचंद्र गवळे देविदास मेहेर तसेच परिसरातील भाविक भक्त आणि ग्रामस्थ उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here