प्रतिनिधी: ज्ञानेश्वर वायदंडे
तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथे मकर संक्रातीनिमित्त राहुल दादा करपे पाटील स्पेशल फाउंडेशन च्या वतीने तळेगाव रांजणगाव संडास गटातील गावांमध्ये मकर संक्रांति निमित्त जिल्हा परिषद शाळा हायस्कूल अंगणवाडी शाळेत तिळगुळ वाटप करण्यात आले. युवा उद्योजक योगीराज समूहाचे चेअरमन तसेच युवकांचे प्रेरणास्थान मित्रपरिवार यांचा सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी राहुल दादा करपे पाटील सामाजिक फाउंडेशन ची स्थापना केली.शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी राहुल दादा करपे पाटील फाउंडेशन तर्फे पूर्णपणे प्रयत्न केला गेला,तसे सामाजिक क्षेत्रातील सर्व लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी घोलपवाडी येथे जनसंपर्क कार्यालय उभारण्यात आले.या कार्यालयामध्ये अनेक प्रकारचे उपक्रम राबवण्यात आले.यावेळी उरळगाव. दहिवडी. पारवडी. सातकरवाडी. निमगाव म्हाळुंगी.आरणगाव.रांजणगाव सांडस.करंजावने.विठ्ठलवाडी डिग्रजवाडी तिळगुळ वाटप कार्यक्रम करण्यात आला. यावेळी उरळगावचे सरपंच अशोक चव्हाण, काकासाहेब करपे,काकासाहेब ढेरंगे,आलेगाव चे पोलीस पाटील विशाल अवचिते,रांजणगाव चे पोलीस पाटील विशाल रोकडे, टाकळी भिमाचे पोलीस पाटील प्रकाश करपे,निवेदक आकाश वडघुले, नवनाथ काळभोर,अविनाश जाधव, अण्णा काळे,शरद संकपाळ, उद्योजक बापूसाहेब करपे, मोहन सत्रास,श्रावण बांडे,विशाल ओव्हाळ, दादासाहेब रणसिंग,संतोष सत्रास.उपस्थित होते


No comments:
Post a Comment