नर्मदा बाल विकास मंदिर वाघजाई नगर येथील शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Friday, January 27, 2023

नर्मदा बाल विकास मंदिर वाघजाई नगर येथील शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला



  पुणे प्रतिनिधी

दि.26/01/2023 रोजी नर्मदा बाल विकास मंदिर वाघजाई नगर आंबेगाव खुर्द कात्रज पुणे येथे झेप फाउंडेशन पुणे (महाराष्ट्र राज्य) चे संस्थापक/ सचिव शिवाजी मुसळे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.

सुरुवातीला शाळेतील विद्यार्थ्यांनी वाघजाई नगर परिसरात प्रभात फेरी काढली व वाघजाई नगर येथील जय मल्हार चौकातील ध्वजारोहण फुलचंद मुसळे( बप्पा) यांच्या हस्ते करण्यात आले व नंतर प्रभात फेरी नर्मदा बाल विकास मंदिर शाळेकडे गेली ध्वजारोजनासाठी सर्व प्रमुख पाहुणे व वाघजाई नगर परिसरातील मान्यवर  उपस्थित होते.

प्रमुख मान्यवर झेप फाउंडेशन पुणे (महाराष्ट्र राज्य) चे संस्थापक/ अध्यक्ष कांता (भाऊ) राठोड , संस्थापक/सचिव शिवाजी मुसळे, कोषाध्यक्ष रमेश राठोड, महाराष्ट्र राज्य सदस्य राहुल भोंडवे, भोर तालुका सचिव योगेश भिलारे, कात्रज शहर प्रमुख सोहेल पिंजारी, व नर्मदा शाळेचे संस्थापक संदीप शिंदे सर, निशा मॅडम, व शाळेतील इतर स्टाफ व वाघजाई नगर परिसरातील प्रकाश करचे ,सुभाष मानकर, संकेत जायभाय ,संतोष कोटावळे, ज्ञानेश्वर अंधारे,भाईजान व वाघजाई नगर परिसरातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

ध्वजारोहण व आभार प्रगटनाच्या कार्यक्रमानंतर शाळेतील मुला मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रमा चे प्रदर्शन केले त्यानंतर झेप फाउंडेशन पुणे (महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्फत शाळेतील मुलांना गोळ्या, बिस्किटे, चॉकलेट,व खाऊ वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here