.jpeg)
शिरूर प्रतिनिधी.
सरदवाडी येथील राहणाऱ्या आणि बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिकणाऱ्या इयत्ता सहावी तील 12 वर्षाच्या चिमुरडीने स्वतःचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. श्री मळगंगा दिव्यांग, अंध व अपंग महाविद्यालय टाकळी हाजी येथील अंध, अपंग विद्यार्थ्यांन समवेत आपला वाढदिवस साजरा करण्यात यावा या चिमुकलीच्या भावनेला तसेच समाजाला प्रेरणा मिळणाऱ्या उपक्रमाला चव्हाण कुटुंबीयांकडून दुजोरा देण्यात आला. व हा उपक्रम अतिशय सुंदर व उत्कृष्ठ पद्धतीने पार पडला. इयत्ता सहावीत शिकणाऱ्या तेजस्विनी साहेबराव चव्हाण हिच्या एवढ्या कमी वयात अंध व अपंग व्यक्तीन विषयी असणारी आपुलकी व सामाजिक बांधिलकी ह्याची जाण ठेवून हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्याचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे. कारण आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून मळगंगा दिव्यांग अंध अपंग विद्यालय टाकळी हाजी येथे सर्व दिव्यांग बांधवान समवेत आपला तेरावा वाढदिवस तेजस्विनी साहेबराव चव्हाण हिने साजरा केला. सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना एक दिवसाचे स्नेहभोजन देऊन आपला अभिष्टचिंतन सोहळा अगदी आनंदात व जल्लोषात साजरा केला.तेजस्विनी ला आपल्या घरातूनच आई-वडिलांकडून सामाजिक कार्याच बाळकडु मिळालेलं आहे. तिच्या कुटुंबाच्या असणाऱ्या अध्यात्मिक वारसाला तीच्या वडिलांनी सुद्धा तसेच पुढे चालू ठेवले आहे. पंढरपूरच्या दिंडीला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी चहा, नाष्टा तसेच समाजातील इतर गरजू बांधवांसाठी व कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये चव्हाण कुटुंबीय नेहमीच अग्रेसर असतात दुसरीकडे मोठा वाढदिवस साजरा करून जो अनाठाई खर्च होतो त्या खर्चाला फाटा देऊन व तिला घरच्यांकडून मिळणाऱ्या खाऊच्या पैशातून ते पैसे साठवून तिने दिव्यांग बांधवान समवेत अभिष्टचिंतन सोहळा साजरा केला विशेष म्हणजे तेजस्विनी बालाजी इंग्लिश मीडियम शिकत असुन अभ्यासाबरोबरच उत्कृष्ट अशी नृत्यांगना आहे व अभिनय क्षेत्रामध्ये देखील आपला ठसा तिने उमटविलेला आहे. अभिनयाची आवड असल्यामुळे तिने बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल साठी दादासाहेब फाळके यांची प्रतिमा भेट दिली. अनेक वेब सिरीज, शॉर्ट फिल्म, मध्ये तिने आतापर्यंत अभिनय केलेला आहे.आता चित्रपटात देखील तिने पदार्पण केलेले आहे.लेखक दिग्दर्शक नागेश पवार यांनी देखील तिचा अभिनय पाहून आपल्या येणाऱ्या आगामी चित्रपटात काम करण्याची संधी दिली आहे. या चित्रपटाची शूट एप्रिल मध्ये चालू होणार आहे. लेखक दिग्दर्शक किरण गाजरे यांच्या बैलगाडा शर्यत या वेब सिरीज मध्ये देखील तिने सुंदर असा अभिनय केलेला आहे.श्री मळगंगा अंध अपंग महाविद्यालयाच्या संस्थापक, अध्यक्ष श्रीमती जाई ताई खामकर यांच्या संघर्ष मई जीवनाची वाटचाल आणि प्रेरणा घेवुन जीवनामध्ये असेच काहीतरी वेगळं करण्याची जिद्द यानिमित्ताने तेजस्विनी ने प्रत्येक वर्षी आम्ही दिव्यांग अंध अपंग विद्यार्थ्यांसमवेतच अभिष्टचिंतन सोहळा साजरा करणार आहोत असा तिने निर्धारच केला आहे. व तिच्या ह्या सामाजिक कार्य साठी तिच्या कुटुबीयांन कडून सुद्धा तिला पाठबळ मिळणार आहे. असे तेजस्विनीचे वडील श्री साहेबराव चव्हाण व इतर कुटुंबीयांनी सांगितले आहे. जाई ताई खामकर यांच्या महाविद्यालयातून यावेळेस अनेक विद्यार्थ्यांनी सुंदर प्रकारे स्वागत गीत व सुंदर गाणी सादर केली. या कार्यक्रमानिमित्त स्वतः अंध असणाऱ्या जाई उत्तम खामकर - संस्थापक अध्यक्ष मळगंगा अंध अपंग सेवा संस्था उपस्थित होत्या. त्या अंध असून सुद्धा अंध अपंगाची संस्था चालवतात खरोखर त्यांच्या कार्याला सलाम.तसेच बाळू महादू चोरे - संचालक तुकाराम बाबुराव रासकर- संचालक लक्ष्मण सोपान गोरडे - संचालक आशाबाई देवराम मुसळे - संचालक माऊली गंगाराम पवळे - सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बाबुराव रवंदळ - प्राचार्य न्यू व्हिजन कला वाणिज्य महाविद्यालय अजिंक्य सतीश घोडे -लिपिक चित्रा विठ्ठल कांदळकर - वस्तीगृह अधीक्षक राम चोरे - शिपाई ओंकार चोरे - शिपाई उपस्थित होते. तसेच तेजस्विनी ज्या लघुपटात काम करते त्यातील जेष्ठ कलाकार, मार्गदर्शक श्री सचिन भाऊ शिंदे कवठेकर, ज्येष्ठ कलाकार भरत घावटे दत्ता वाबळे , भंडारे, अवधूत देशमुख, महाराष्ट्र फ्रेश न्यूज चे संपादक अक्षय वेताळ व त्यांचे सहकारी,गौरव बोरकर व अन्य हितचिंतक उपस्थित होते.


No comments:
Post a Comment