21 वर्षीय तरुणाला जिवंत जाळलं, मृतदेह गायरान जमिनीत जळालेल्या अवस्थेत सापडला - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Sunday, February 9, 2025

21 वर्षीय तरुणाला जिवंत जाळलं, मृतदेह गायरान जमिनीत जळालेल्या अवस्थेत सापडला

 

जालना - जालन्यात एका 21 वर्षीय तरुणाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील मेहुना गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने बदनापूर तालुक्यासह जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. आकाश जाधव असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. आज दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह गावातील गायरान जमिनीमध्ये जळालेल्या अवस्थेत मिळून आलाय. दरम्यान मयत तरुणाची हत्या कोणी आणि कोणत्या कारणाने केली? याचा  तपास पोलिसांनी सुरु केलाय. आकाश जाधवला आलेल्या एका फोन वरून पोलीस चौकशी करत असल्याची देखील माहिती आहे.

आकाश जाधव हत्याप्रकरणात पोलीस तपास सुरु 

अधिकची माहिती अशी की, आकाश जाधव या 21 वर्षीय तरुणाची जिवंत जाळून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, आकाश जाधवची हत्या कशामुळे आणि कोणी केली? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. दरम्यान, आकाशची अमानुषपणे हत्या करण्यात आल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येतोय.

               

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here