न्हावरे : येथील त्रिमूर्ती प्लॅस्टिक होलसेल दुकानाला भीषण आग लागली त्या आगीमध्ये कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले ही आग लागण्याचे कारण.
दुकानापुढे रस्त्याच्या कडेला विद्युत रोहित बसवलेले आहे. या विद्युत रोहित्राला सकाळी नऊच्या सुमारास एका चार चाकी वाहनाने भरधाव वेगाने धडक दिली या धडकेने विद्युत रोहित्र कोसळले आणि शॉर्टसर्किट झाले.
त्यामुळे ही आग लागली या आगीत गुलाब पडवळ यांच्या मालकीच्या दुकानाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग विझवण्यासाठी रांजणगाव, कारेगाव व शिरूर नगरपरिषद यांच्या अग्निशामक पथकातील कर्मचारी यांचे प्रयत्न चालू आहे.
रस्त्याच्या कडेला वीज वितरण कंपनीने विद्युत रोहित्र बसू नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे परिसरातील ग्रामस्थांची घटनास्थळी हळहळ व्यक्त होत आहे.









No comments:
Post a Comment