तुळजापुरात देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या मिनी बसला अपघात, बस चालकासह 3 जणांचा मृत्यू - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Sunday, February 9, 2025

तुळजापुरात देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या मिनी बसला अपघात, बस चालकासह 3 जणांचा मृत्यू

मोहोळ- सोलापुरात तुळजापुरात देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या मिनी बसला अपघात झाला आहे. या अपघातात बस चालकासह 3 जणांचा मृत्यू झाला. तर 15 जण जखमी झाले आहेत. सध्या या अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मोहोळ तालुक्यात ही घटना घडली असून यात तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे.

नेमकं काय घडलं?

सोलापूर पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यातील कोळेवाडी जवळ ट्रक, मिनीबस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यावेळी ट्रक आणि दुचाकीची धडक झाल्यानंतर ट्रकने राँग साईडला जाऊन मिनी बसला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की मिनी बस थेट पलटी झाली. यामुळे बसमध्ये असलेले प्रवाशी जखमी झाले. या मिनी बसमधील भाविक तुळजापुरात देवदर्शनासाठी जात होते.

या दुर्घटनेत बस चालकासह 3 जणांचा मृत्यू झाला. तर 15 जण जखमी झाले. दुचाकीस्वार दयानंद भोसले, मिनी बस चालक लक्ष्मण पवार यांच्यासह एकाचा जागीच मृत्यू झाला. मोहोळ तालुक्यात कंटेनर मिनी बस आणि दुचाकीचा अपघात झाल्यानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

या अपघातानंतर क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेली मिनी बस बाजूला करण्यात आली. याप्रकरणी कंटेनर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



 

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here