पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने 'टॉप टेन' पुरस्कार सोहळा संपन्न - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Sunday, February 2, 2025

पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने 'टॉप टेन' पुरस्कार सोहळा संपन्न

 



◻️ अठयाण्णव वेळा रक्तदान करणाऱ्या रक्तदाता - श्रीमती अंजू सोनवणे

 (सुजित मैड) - पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघ तसेच अखिल मराठी पत्रकार संस्था महाराष्ट्र राज्य आयोजित 'पीसीएमसी टॉप टेन' पुरस्कार सोहळा संपन्न झाला या पुरस्काराचे वितरण प्रसिद्ध उद्योगपती पद्मश्री अरुण फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आले शैक्षणिक व सामाजिक कार्य तसेच नेत्रदान, देहदान, अठयाण्णव वेळा रक्तदान करणाऱ्या रक्तदाता म्हणून प्रेरणादायी असलेल्या श्रीमती अंजू कोंडीराम सोनवणे श्री.फत्तेचंद जैन विद्यालय व जुनियर कॉलेज चिंचवड मधील गुणवंत शिक्षिका यांना त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य म्हणून अनेक क्षेत्रांमध्ये म्हणजेच रक्तदान, नेत्रदान,अवयवदान,पर्यावरण, साहित्य क्षेत्र, काव्य मंच,मुक्ताई महिला बचत गट,पोलीस नागरिक मित्र,अनाथ आश्रम,वृद्धाश्रम,स्काऊट गाईड,सेवा उपक्रम धार्मिक उपक्रम प्रौढ साक्षरता रक्तदानाचा प्रचार आणि प्रसार महिलांना कमवा आणि प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी स्काऊट गाईड अशा अनेक क्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळवला अशा कामगिरीची दखल घेत पिंपरी चिंचवड शहरातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here