२९ वर्षांनी रंगला आठवणीत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा. - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 9, 2024

२९ वर्षांनी रंगला आठवणीत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा.


शिरूर प्रतिनिधी अक्षय वेताळ

 पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री मल्लिकार्जुन विद्यालय न्हावरे मधील १९९५-१९९६ च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा दि. ५ ऑक्टोबर रोजी तब्बल २९ वर्षांनी रौप्यमहोत्सवी स्नेहसंमेलन उत्साहात पार पडला या ठिकाणी प्रसिद्ध व्याख्याते तथा समाजप्रबोधनकार प्रा. वसंत हांकारे यांचे व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. हांकारे यांचे बाप समजून घेताना या विषयावर व्याख्यान झालं. वरून कठोर वागणारा बाप मनातून आपल्या लेकरासाठी कसा झुरतो. आपल्या आई-वडिलांचे आपल्या जीवनात काय स्थान आहे, हे प्रा. हांकारे यांनी आपल्या व्याख्यानातून पटवून दिले. त्यांच्या व्याख्यानाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले

 तर अनेकांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या. २१ व्या शतकामध्ये मोबाईलमुळे पूर्ण पिढी बिघडत चालली असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. शाळेसाठी हनुमंत हिंगे यांनी परसबाग दिली.तसेच यावेळी ५००० लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती  व अकबर अली बागवान यांनी शौचालय स्वच्छ करण्यासाठी एसटी पंप दिला या प्रसंगी लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष मा. किशोर राजे निंबाळकर तसेच ठाण्याचे उपजिल्हाधिकारी संदीप पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी उपस्थितीमध्ये प्रकाशशेठ कुतवळ, मानसिंग वचकल  पोलीस निरीक्षक वरळी, वसंतराव कोरेकर, राजेंद्र कोरेकर, सौ कमल कोकडे ( सरपंच न्हावरे), सौ संगीताताई कुटे (उपसरपंच न्हावरे) व आदी ग्रामस्थ उपस्थितीत होते. यावेळी सेवानिवृत्त शिक्षकांचा शाल, श्रीफळ व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तसेच कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी विद्यार्थीनी चा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. 

त्यांनतर सिनेअभिनेता सुभाष यादव यांचा महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन बहिरट व कार्यक्रमाचे आभार राजेश थिटे यांनी मांडले, मेळावा पार पाडावा यासाठी श्री शहाजी पवार, संतोष गायकवाड, विकास भगत, अकबर बागवान, सुरेश वेताळ, तुकाराम सोनवणे या माजी विद्यार्थ्यांनी महत्वाची भूमिका बजावली कार्यक्रमाच्या शेवटी विध्यार्थी, तसेच समस्त ग्रामस्थ यांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here