दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धानोरा केंद्राची शैक्षणिक सहल नागपूरला - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Sunday, February 16, 2025

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धानोरा केंद्राची शैक्षणिक सहल नागपूरला


 


यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी : बंडु भारसकरे


राळेगाव : जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत पंचायत समिती राळेगाव मधील धानोरा केंद्राची शैक्षणिक सहल दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी धानोरा या केंद्र शाळेच्या मुख्यालया मधून पहाटे सकाळी चार वाजता अगदी वेळेवर निघाली. शैक्षणिक सहलीमध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केंद्र शाळा धानोरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दापोरी कासार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परसोडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुधापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंदरी या धानोरा केंद्रातील शाळांचा सहभाग असून. 

धानोरा केंद्राच्या उज्वल परंपरेप्रमाणे शैक्षणिक सहल अगदी वेळेवर दोन्ही बसेसची  संजय कारवटकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती धानोरा यांच्या हस्ते व सुभाष पारधी केंद्रप्रमुख धानोरा, 

विजयकुमार लांबट सर मुख्याध्यापक त्याचप्रमाणे  भास्कर खंडाळकर सर मुख्याध्यापक यांनी पूजा करून

बस धानोरा येथून निघाल्या वडकी मार्गे खापरी मेट्रो येथे बसेस पोहोचल्या. सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांचा मेट्रो प्रवास अतिशय उत्साहाच्या वातावरणात सुरू झाला. मुलांनी मेट्रो प्रवासाचा आनंद घेतला लगेच बसेस रमण विज्ञान केंद्राकडे निघाल्या रमण विज्ञान केंद्र येथे पोहोचतात मुलांनी जेवण केले आणि लगेच रमण विज्ञान केंद्रामध्ये असलेला थ्रीडी शो तारांगण व विज्ञानाचे विविध प्रयोग विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक करून बघितले मुलांना विज्ञानाचे प्रयोग हाताळले त्यांना अतिशय आनंद झाला मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय  होता.

भ्रमण विज्ञान केंद्र नंतर लगेच बसेस दीक्षाभूमीसाठी रवाना झाल्या दीक्षाभूमीवर माहिती प्रमोद सुभाष कारगे यांनी दीक्षाभूमीवर ऐतिहासिक पार्श्वभूमी पटवून दिले त्यानंतर सर्वांनी जेवण केले आणि लगेच बसेस विमानतळाकडे निघाल्या विमानतळावर पोहोचतात तिकिटे काढल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना गॅलरी मधून सर विमानांचे आवाहन विमाने कसे उतरतात कसे उडतात प्रवासी कसे चढतात कसे उतरतात त्याचप्रमाणे विमानामध्ये सामान कसे नेतात या सर्व प्रकारची माहिती विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी बघून घेतली 

अशाप्रकारे आनंदमय वातावरणात शैक्षणिक सहल नागपूरला गेली यावेळी सहल नियोजन प्रमुख विजय लाबंट मुख्याध्यापक धानोरा, सहल प्रमुख संदिप टुले, आरोग्य विभाग प्रमुख नीलीमा पाटील, बस प्रमुख रीना चौधरी, तसेच रत्नमाला धुर्वे, रडके मॅडम, देशमुख सर, खडांळकर सर, योगेश घोडे, हाते सर हर्षदा सुरकर, यांनी सहलीसाठी प्ररीश्रम घेतले.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here