आष्टोना येथील शेतकऱ्याची आत्महत्या . - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Sunday, February 16, 2025

आष्टोना येथील शेतकऱ्याची आत्महत्या .



यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी : बंडु भारसकरे


राळेगाव : राळेगाव तालुक्यातील आष्टोना या गावातील  हनुमान लक्ष्मण डाहुले वय ४५ वर्षे या शेतकऱ्याने१६ फेब्रुवारी रोजी रविवारी सकाळी ११ वाजता कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातीलच चिंचेच्या झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली. सदर शेतकऱ्याकडे अडीच एकर शेती होती त्यांच्यावर सोसायटीचे ६० हजार रुपये कर्ज थकीत होते व इतर सावकारी कर्ज होते. सदर घटनेची माहिती मिळतात वडकी पोलीस स्टेशनचे बीट जमादार अविनाश चिकराम यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी राळेगाव येथे करून आष्टोना या गावी अंत्यसंस्कार करण्यात आला. पुढील तपास वडकी पोलीस स्टेशन करीत आहे. 


सदर मृत व्यक्तीच्या पाठीमागे आई-वडील पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे. हनुमान डाहुले यांच्या असे आकस्मिक जाण्याने डाहुले परिवार व आष्टोना गावात शोककळा पसरली आहे.









No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here