कचरा गाडी फिरत नसताना सुद्धा कंत्राटदाराचे बिल निघतात कसे? - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 18, 2025

कचरा गाडी फिरत नसताना सुद्धा कंत्राटदाराचे बिल निघतात कसे?




उमरखेड प्रतिनिधी : शेख रमजान


ढाणकी : नगरपंचायत मध्ये प्रशासक लागले पासून गावात कचरा गाडी गायब झाले असल्याची चर्चा सध्या नागरिक करीत आहे. नगरपंचायत ने कोटी रुपये खर्च करून कचरा कंत्राट दिले आहे. हेच

कोटी रुपये ढाणकी नगरपंचायत नागरिकांकडून उक्कळल्या जात आहे. असे असताना सुद्धा नगरपंचायत स्वछता अधिकारी,लोकांनी मेहनत केलेला पैसा स्वच्छता कर म्हणून भरलेल्या पैस्याची उधळण करून , नगर पंचायत अधिकारी कंत्राट कडून कमिशन तर घेऊन बिल तर देत नाही ना? 

अशा प्रश्न नागरिकांना भेडसावत असल्याचे बोलल्या जात आहे.कचरा कंत्राटदाराला न चुकता महिन्याचे बिल भेटत आहे. पण स्वच्छता अधिकारी गावात कचरा गाडी फिरते की नाही? कचरा दररोज किती किलो जमा होते?कचरा डम्पिंग ला जमा होते की नाही?हे न बघता कंत्राट ची चौकशी न करता बिल कसे देतो?

आज दोन दोन -तीन दिवस कचरा गाडी गावात फिरत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. घरात साठवलेला कचरा रोगाना आमंत्रण देत आहे.यामुळे नागरिक म्हणत आहे की, आता आम्ही कोणाकडे तक्रार करावी जर आम्ही स्वच्छता कर भरून सुद्धा आमच्या आरोग्याची काळजी नगरपानंच्यात घेत नसेल?




 

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here