गजानन मारोती सुरोशे यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा ढाणकी अध्यक्ष पदावर निवड. - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 18, 2025

गजानन मारोती सुरोशे यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा ढाणकी अध्यक्ष पदावर निवड.


उमरखेड प्रतिनिधी : शेख रमजान


ढाणकी : ढाणकी सारख्या गावात राहून मोल मजुरी करणारा. गजानन सुरोशे आपल्या चर्मकार समाजासाठी अहो रात्र मेहेनत घेणारा.त्याने आपल्या समाजाला एकत्र यावे म्हणून नगरपंचायत ला संत रोहिदास महाराज सभागृह साठी जागेचा आग्रह धरला होता यात त्याच्यावर पोलीस कार्यवाही झाली. तो एक मोल मजुरी करून आपले घर चालवणारा यात परेशान झाला पण त्याने हार नाही मानली. आणि त्याने त्याच जोमाने आपल्या समाजाला एकत्र आणून दरवर्षी संत रोहिदास महाराजांची जयंती साजरी करतो. माजी समाज कल्याण मंत्री आणि ज्येष्ठ समाजसेवक बबनराव (नाना) घोलप ज्यांनी 

चर्मकार बंधू आणि भगिनींना एकाच छताखाली आणण्यासाठी आणि समाजाचे संघटन व्हावे म्हणून २४ सप्टेंबर १९९५ रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाची स्थापना केली होती.ही संघटना स्थापन करून  तळागाळातील समाज बांधवांची सेवा करून त्यांना एकत्र आण्याचा एकमात्र उद्देश ठेवला आणि हेच उद्देश समोर ठेऊन  गजानन सुरोशे हा ढाणकी सारख्या गावात चर्मकार सामाजाला तो  एकत्र

करण्यासाठी धडपड करताना त्याची दखल सुद्धा बातमी पत्रात झळकत असल्याचे पाहून  त्यांनी 12 फेब्रुवारी 2025 या दिवशी संत शिरोमणी जगद्गुरु रविदासजी महाराज यांच्या जयंती मध्ये भव्य प्रबोधनाच्या कार्यक्रम मध्ये आमंत्रीत करून गजानन सुरोशे यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघ ढाणकी शहर अध्यक्ष म्हणून निवड केली.


यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघ नांदेड संस्थापक बबनरावजी घोलप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माधव गायकवाड नांदेड जिल्हा उत्तरध्यक्ष गजानन जोगदंड विदर्भ अध्यक्ष संभा वाघमारे  माधवराव निंबाळकर तसेच उपस्थित पाहुणे उंबरखेड महागाव आमदार किसनराव वानखेडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.तसेच या कार्यक्रमात उपाध्यक्ष  करण कामाजी परतुडे तर सचिव पदी दीपक बंडू सुरोशे यांची निवड करण्यात  आली.

यावेळी सोपान पहूकर,विजय पहुकर,दिलीप पडतुडे,बबन पडतुडे, लक्ष्मण पहुकर, प्रभू गायकवाड, दत्ताजीराव गायकवाड बंडू सुरोशे, मारोती सुरोशे,आदित्य गायकवाड,वेदांत सुरोशे,हजारो चर्मकार समाजातील महिला आणि पुरुषांनी राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा ढाणकी अध्यक्ष पदावर निवड झाल्या बद्दल त्याचे अभिनंदन केले.




 

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here