शिरूर बाजार समिती परिसरात विद्युत वायर चोरी – अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Sunday, February 23, 2025

शिरूर बाजार समिती परिसरात विद्युत वायर चोरी – अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल


शिरूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पश्चिम बाजूस असलेल्या एका गाळ्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे १८,९८० रुपयांचे वायरच्या बंडलची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यश भरत बरमेचा (वय २८, व्यवसाय – गुंतवणूक सल्लागार, रा. मुंबई बाजार, शिरूर) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ते २३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घटना घडली.

अज्ञात चोरट्याने गाळ्याचे कुलूप तोडून आत ठेवलेला पॉलीकॅब आणि फिनोलेक्स कंपनीच्या वायरचा साठा चोरून नेला. यात पॉलीकॅब वायर (२.५ एम.एम.) ची ४ बंडल (एकूण किंमत १०,७२० रुपये) आणि फिनोलेक्स वायर (१ एम.एम.) ची ७ बंडल (एकूण किंमत ८,२६० रुपये) असा एकूण १८,९८० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.

या घटनेनंतर फिर्यादीने तातडीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार भा.दं.वि. कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ अंतर्गत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार जगताप करीत आहेत.

दरम्यान, बाजार समिती परिसरात चोरीच्या घटना वाढत असल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकारांवर आळा घालण्यासाठी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here