नीलम गोऱ्हेंचा खळबळजनक गौप्यस्फोट!
दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये पार पडलेल्या या संमेलनात बोलताना नीलम गोऱ्हे यांनी मोठा दावा केला. "उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज गाड्या द्याव्या लागत होत्या," असे वक्तव्य करून त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली.
त्यांचे वक्तव्य ऐकताच संमेलनातील वातावरण तंग झालं, मात्र यावर पडदा पडण्याआधीच गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आणखी एक धक्कादायक दावा केला. "मी साहित्य महामंडळाच्या सदस्यांना ५० लाख रुपये देऊन या कार्यक्रमात सहभागी झाले आणि उषा तांबे यांना मर्सिडीज गाडी भेट देऊन कार्यक्रमाचे आयोजन करायला लावले," असे त्यांनी जाहीरपणे सांगितल्याचा आरोप होत आहे.
संजय राऊत आक्रमक – "साहित्य संमेलन विकले गेले का?"
या वक्तव्यावर ठाकरे गटाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संजय राऊत यांनी थेट उषा तांबे यांना पत्र लिहून या संमेलनाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
राऊत यांनी पत्रात विचारलेले महत्त्वाचे मुद्दे –
- साहित्य संमेलन साहित्यिक मंच आहे की राजकीय प्रचाराचं व्यासपीठ?
- महामंडळाच्या व्यासपीठावरून राजकीय आरोप करण्यास परवानगी का दिली गेली?
- साहित्य महामंडळाला या वक्तव्यांबद्दल कोणतीही भूमिका घ्यायची नाही का?
- जर महामंडळ हे वक्तव्य मान्य करत नसेल, तर त्यांनी जाहीर माफी मागावी.
साहित्य महामंडळाच्या प्रतिष्ठेला तडा?
गोऱ्हे यांच्या वक्तव्यामुळे साहित्य संमेलनावर आणि महामंडळाच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. "साहित्य महामंडळ विकले गेले आहे, अशी चर्चा लोकांमध्ये सुरू झाली आहे, आणि हे चित्र चिंताजनक आहे," असेही राऊत यांनी आपल्या पत्रात नमूद केले.
महामंडळाची भूमिका काय?
या संपूर्ण वादावर साहित्य महामंडळ आता कोणती भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. साहित्य संमेलन राजकीय हस्तक्षेपाच्या गर्तेत सापडत आहे का? या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी आता महामंडळाच्या अधिकृत भूमिकेची प्रतीक्षा आहे.या संमेलनाने मराठी साहित्यविश्वाच्या प्रतिष्ठेला गालबोट लावलं आहे का? यावर आता उषा तांबे आणि साहित्य महामंडळाची अधिकृत प्रतिक्रिया काय असेल, याकडे संपूर्ण साहित्य, सांस्कृतिक आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. महामंडळ गप्प राहणार की स्पष्ट भूमिका घेणार? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.








No comments:
Post a Comment