ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत नव संजीवनी व माँ साहेब जिजाऊ महिला ग्रामसंघाची सर्वसाधारण सभा व हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 5, 2025

ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत नव संजीवनी व माँ साहेब जिजाऊ महिला ग्रामसंघाची सर्वसाधारण सभा व हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

 


प्रतिनिधी - रिजवान बागवान 

        सणसवाडी- शिरूर तालुक्यातील औद्यौगिक नगरी असलेल्या सणसवाडी येथील शिवम मंगल कार्यालय येथे ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत नव संजीवनी व माँसाहेब जिजाऊ महिला ग्रामसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा व हळदी कुंकू समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न करण्यात आला.

                   सदरील कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषद सदस्या कुसूमताई मांढरे,शिरूर पंचायत समितीच्या माजी सभापती मोनिकाताई हरगुडे,मनिषाताई कटके,रेखाताई बांदल,सणसवाडीच्या सरपंच रूपालीताई दरेकर,प्रभाग समन्वयक सोनल सोनोने,अनिल नरके,यशशक्ती प्रभागसंघ पदाधिकारी सुवर्णाताई दिघे,कोमलताई ढेरंगे आदि मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

               नव संजीवनी महिला ग्राम संघातील तीन उत्कृष्ट समुह,तीन यशस्वी उद्योजक यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.तसेच नव संजीवनी ग्राम संघातील पदाधिकारी यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अध्यक्षा मीनाक्षीताई हरगुडे,सचिव प्रतिक्षा हरगुडे,कोषाध्यक्ष गीताताई हरगुडे,लिपिका शुभांगी हरगुडे,व समूह संसाधन व्यक्ती वर्षाताई मोरे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

                     माँसाहेब जिजाऊ महिला ग्राम संघाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अध्यक्षा नयनाताई हरगुडे,कोषाध्यक्ष सुरेखाताई दरेकर,सचिव शिल्पाताई गाडे,लिपिका पुजाताई कागदे,समुह संसाधन व्यक्ती रूपाली कांचन यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.नव संजीवनी व माँ साहेब जिजाऊ ग्रामसंघातील लिपिका शुभांगी हरगुडे,पूजा कागदे यांनी अहवालाचे सखोल असे वाचन केले.यावेळी समन्वयक सोनल सोनवणे यांनाही सन्मानचिन्ह गौरविण्यात आले.



              महिलांच्या करमणुकीसाठी वेगळं काहीतरी म्हणुन बिभिषण गदादे (भाऊजी) यांचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी महिलांनी खूप छान प्रतिसाद दिला.याप्रसंगी दिपालीताई हरगुडे,सुनिताताई गौण,अंजनाताई क्षिरसागर यांनी पैठणी साड्या जिंकल्या.यावेळी महिला भगिनी मोठ्या संखेंने उपस्थित होत्या.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here