संत तुकाराम महाराजांचे वंशज व्याख्याते शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 5, 2025

संत तुकाराम महाराजांचे वंशज व्याख्याते शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या




देहु (प्रतिनिधी) : देहूतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. संत तुकाराम महाराजांचे वंशज, प्रसिध्द व्याख्याते आणि शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष महाराज मोरे (वय-३०) यांनी आज सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेने देहू परिसरात शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

शिवव्याख्याते म्हणून शिरीष महाराज मोरे यांचा सर्वत्र नावलौकीक होता. यामध्ये दुर्दैवाची बाब म्हणजे नुकताच मोरे यांचा विवाह ठरला होता,



 तसेच टीळासुध्दा झाला होता. हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात ते कायम भाष्य करत आले होते. 'लव्ह जिहाद', 'उद्योग जिहाद', 'लॅण्ड जिहाद', 'फूड जिहाद', धर्मांतरणासारख्या प्रकरणावरही त्यांचे भाष्य गाजले होते.




No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here