जी. बी. एस. च निदान झालं - पाणीपुरी कारण ठरलं, नेमक घडलं काय ? - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 19, 2025

जी. बी. एस. च निदान झालं - पाणीपुरी कारण ठरलं, नेमक घडलं काय ?



बारामती : बारामती शहरात एका तरुणीचा जी.बी. सिंड्रोम आजाराने मृत्यू झाल्याची घटना घडली. किरण राजेंद्र देशमुख असे या तरुणीचे नाव आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आता नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


पुण्यातील सिंहगड परिसरात शिकत असलेल्या तरुणीला तीन आठवड्यापूर्वी पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्रास सुरू झाला होता तिच्यावर उपचार सुरू होते ती बारामतीत पोहोचल्यानंतर जुलाब आणि अशक्तपणा जाणवू लागला ती बारामतीतील रुग्णालयात उपचारासाठी गेली असता डॉक्टरांना शंका आल्याने तिला पुण्याला उपचारासाठी जाण्याचा तेथील डॉक्टरांनी सल्ला दिला.


तिच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू झाले तीन आठवडे जी.बी. सिंड्रोमला दिलेला लढा आज संपला.यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. तिला उपचारासाठी पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिला जी .बी. सिंड्रोम झाल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरू होते पण उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने तिचे दुःखद निधन झाले. 


बारामतीतील किरण ही शिक्षणाच्या निमित्ताने नातेवाईकांकडे राहत होती.जी. बी. एस म्हणजेच जी.बी.सिंड्रोम चा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात निर्बंध आणले जाऊ शकतात त्यामुळे सर्वांनी सतर्क राहणे व काळजी घेणे गरजेचे आहे.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here