शिरूरमध्ये आढळला अनोळखी मृतदेह - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Sunday, February 23, 2025

शिरूरमध्ये आढळला अनोळखी मृतदेह


शिरूर : तालुक्यातील पाषाणमळा येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी (दि. 23 फेब्रुवारी) सायंकाळी घडली.
प्राप्त माहितीनुसार, प्रवीण कैलास साळुंखे (वय 29, व्यवसाय शेती, रा. स्वामी समर्थ अपार्टमेंट, शिरूर) यांनी याबाबत पोलिसांना खबर दिली. त्यानुसार, सायंकाळी 7:30 च्या सुमारास मधुकर शिंदे यांच्या गाळ्यासमोर एक अनोळखी इसम अज्ञात अवस्थेत आढळून आला.
शिरूर पोलीस ठाण्यात याची नोंद अ.म.र.नं. 17/2025 प्रमाणे करण्यात आली असून, मृत इसमाचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील तपास सुरू केला आहे.
तपास पोलीस हवालदार खेडकर (3328) करत असून, अधिक तपास सुरू आहे.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here