येरवडा पोलिसांची मोठी कारवाई: जबरी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक, लाखोंचा ऐवज जप्त - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Sunday, February 23, 2025

येरवडा पोलिसांची मोठी कारवाई: जबरी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक, लाखोंचा ऐवज जप्त

पुणे : शहरात जबरी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी येरवडा पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल १.७५ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. येरवडा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने १७ फेब्रुवारी २०२५ रोजी पेट्रोलिंग दरम्यान संगमवाडी रोडवर संशयित हालचाली करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. संशयितांना पकडल्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी येरवडा भागात जबरी चोरी केल्याची कबुली दिली. 

आसिफ अजगर शेख (वय ३२), कुलदीपसिंग युवराजसिंग जुनी (वय २३) आणि मख्खनसिंग लाखनसिंग जुनी (वय ३२). हे तिघेही पाटील इस्टेट, शिवाजीनगर, असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ते पुणे येथील रहिवासी असून, त्यांनी येरवडा भागात नागरिकांना लुटल्याची माहिती चौकशीत उघड झाली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून ७५,००० रुपये किंमतीची सोनसाखळी आणि १ लाख रुपये किंमतीची ऑटो रिक्षा असा एकूण १.७५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या कारवाईमुळे शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार आहे. ही उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त हिम्मत जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत येरवडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक पल्लवी मेहेर, स्वाती खेडकर आणि तपास पथकातील पोलीस अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here