हक्काच्या घराचा मार्ग मोकळा – देवधरीतील लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Saturday, February 22, 2025

हक्काच्या घराचा मार्ग मोकळा – देवधरीतील लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी

    (प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र वाटप)


यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी : बंडु भारसकरे


राळेगाव : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यभरात मोठ्या प्रमाणावर घरकुल मंजुरी दिली जात असून, पुणे येथे सुमारे २० लाख घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच १० लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर, राळेगाव तालुक्यातील देवधरी येथे दिनांक २२ फेब्रुवारी रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.



या कार्यक्रमात एकूण ५६ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. लाभार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व त्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान ग्रामपंचायत सचिव झोटींग यांनी लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम प्रक्रियेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.



लाभार्थ्यांचा  उत्साह


घरकुल मंजुरी पत्र प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. लखन परचाके, कैलास चव्हाण, शंकर कोटनाके, महादेव टेकाम, विलास चव्हाण, कल्पना मेश्राम, सुरेखा पंधरे, रंजना भारसकरे, रमेश भारसकरे, वाघोजी तोडसाम, भारत भारसकरे, मनोहर उरवते, बंडू भारसकरे, राजू भारसकरे, मारोती नेहारे, विलास वनसकर आदी लाभार्थी उपस्थित होते.



शासनाच्या योजनांचा लाभ घ्या –  ग्रामपंचायत सचिव


ग्रामपंचायत सचिव झोटींग यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक गरजू नागरिकांनी घ्यावा. प्रधानमंत्री आवास योजना गरिबांसाठी मोठी संधी असून, सरकारकडून दिलेल्या सुविधांचा योग्य वापर करावा.



कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, अनेक लाभार्थ्यांनी शासनाच्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here