पिस्टल आणि जिवंत काडतुसासह सराईत गुन्हेगार जेरबंद - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Sunday, February 23, 2025

पिस्टल आणि जिवंत काडतुसासह सराईत गुन्हेगार जेरबंद



पुणे : गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने धडाकेबाज कारवाई करत एका सराईत गुन्हेगारास पिस्टल व जिवंत काडतुसासह अटक केली आहे. संशयित आरोपी डायसप्लॉट, गुलटेकडी, स्वारगेट परिसरात अग्निशस्त्र घेऊन वावरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.



शाखा युनिट-२चे अधिकारी आणि अंमलदार नियमित गस्त घालीत असताना पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी आणि शंकर कुंभार यांना माहिती मिळाली की, डायसप्लॉट, गुलटेकडी येथील कॅनॉलजवळ एक इसम पिस्टलसह थांबलेला आहे. तातडीने युनिट-२चे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आशिष कवठेकर आणि त्यांच्या पथकाने या ठिकाणी धाव घेतली.



संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस केली असता त्याने आपले नाव ओंकार बाळू मावस (वय २१, रा. श्री लक्ष्मी प्रोजेक्ट स्टोअर, किराणा दुकानाच्या मागे, गुलटेकडी, मार्केट यार्ड, पुणे) असे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ₹४०,४००/- किमतीचे एक सिल्व्हर रंगाचे लोखंडी पिस्टल मॅगझीनसह आणि एक जिवंत काडतूस सापडले.



याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ३ (२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१)(२)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास स्वारगेट पोलीस स्टेशन करीत आहे.



ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे आणि सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-१) गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सपोनि अशिष कवठेकर, अमोल रसाळ, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, साधना ताम्हाणे, विजय पवार, पुष्पेंद्र चव्हाण आणि नागनाथ राख यांनी या कारवाईत सहभाग घेतला.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here