भाकप यवतमाळ जिल्हा कौंसिलची मारेगाव येथे बैठक संपन्न,वणी येथे राज्यव्यापी कापुस उत्पादक परिषद घेण्याचा निर्णय - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Monday, February 10, 2025

भाकप यवतमाळ जिल्हा कौंसिलची मारेगाव येथे बैठक संपन्न,वणी येथे राज्यव्यापी कापुस उत्पादक परिषद घेण्याचा निर्णय


यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी : बंडु भारसकरे


वणी -भारतीय कम्युनिस्ट पक्ष यवतमाळ जिल्हा कौंसिलची  दि.9 फेब्रु.ला मारेगाव येथे पक्ष कार्यालयात बैठक संपन्न झाली.बैठकिच्या अध्यक्षस्थानी किसान सभेचे राज्य कौंसिलर गुलाबराव उमरतकर होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणुन किसान सभेचे राज्य कौंसिलर अनिल हेपट,हिम्मतराव पाटमासे उपस्थित होते.

बैठकित जिल्हासचिव अनिल घाटे यांने यांनी राज्याचा रिपोर्ट सादर केला,जिल्ह्यातील सभासद नोंदनीचा आढावा घेऊन आतापर्यंत विविध तालुक्यातील झालेल्या सभासद नोंदनीचा अहवाल मांडला.याप्रसंगी विविध तालुक्यातील प्रतिनिधींनी आपापल्या तालुक्यातुन आणलेली सभासद नोंदनी जिल्ह्याकडे जमा केली.आणी उर्वरित सभासद नोंदनी 15 फेब्रु.पर्यंत जमा करण्याचे ठरले.

राज्याचे आदेशानुसार जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पक्ष शाखा परिषदांचा अहवाल मांडला आणी 28 फेब्रु.पर्यंत उर्वरित जुन्या शाखा व नविन शाखा परिषदा घेण्याचे ठरले.याप्रसंगी शेतकरयांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने वणी येथे एप्रीलमध्ये राज्यव्यापी कापुस उत्पादक परिषद घेण्याचा निर्णय घेण्यात आला.


या बैठकीला वणी,मारेगाव,झरी,राळेगाव,पांढरकवडा,बाभुळगाव,यवतमाळ,पुसद,दिग्रस,नेर या तालुक्यातील जिल्हा कौंसिलर उपस्थित होते.संचालन जिल्हा सहसचिव बंडु गोलर यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा सहसचिव संजय भालेराव यांनी मानले.





No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here