पारनेर प्रतिनिधी : अरुण बेलकर
पारनेर : कुकडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पूर्वनियोजित आवर्तन 20 फेब्रुवारी रोजी सुरू होणार होते. उन्हाची तीव्रता व पाण्याची अडचण मुळे शेतकऱ्यांनी आवर्तन वेळेच्या अगोदर सोडण्याची मागणी निघोज परिसरातील 14 गावांनी आमदार काशिनाथ दाते सरा कडे केली होते.
आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद देत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आवर्तन पूर्वनियोजित तारखेच्या अगोदर सोडण्याची विनंती केली.
जलसंपदा मंत्र्यांनी तात्काळ संबंधित अभियंता यांना आवर्तन 15 फेब्रुवारी पासून सोडण्याचे आदेश दिले.
यामुळे निघोज परिसरातील शेतकऱ्यांची पिके वाचतील व उत्पन्नात भर पडेल. शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी मागणी मान्य झाल्याने आमदार काशिनाथ दाते सरांचे व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण जी विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले.





No comments:
Post a Comment