जर जास्त उत्पन्न व चांगल्या प्रतीचे फळ आपल्याला पाहिजे असेल किंवा बाजारभाव चांगला मिळवायचा असेल तर, कोणत्याही फळपिकांच्या उत्तम वाढीसाठी अन गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळवण्यासाठी मुळांचे आरोग्य जपणे अतिशय महत्त्वाचे आहे,
असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचे (उद्यानविद्या विभागाचे) शास्त्रज्ञ डॉ. अमोल विरकर यांनी येथे केले.
छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल यांच्यातर्फे नुकतेच पिंपळगाव (ता. मालेगाव) येथे आयोजित शेतकरी-अधिकारी केशर आंबा व कोरडवाहू भागामध्ये जास्त प्रकारे कसे उत्पन्न मिळेल ते या प्रशिक्षणादरम्यान बोलत होते. यावेळी डॉ. प्रशांत सोनवणे, प्रमुख, डाळिंब संशोधन केंद्र लखमापूर तसेच प्रा. चेतन सोनवणे व डॉ. उदय पवार (कीटकशास्त्र विभाग) इत्यादी प्राध्यापक उपस्थित होते व श्री. प्रवीण पवार श्री. गंगाधर पवार, श्री. लखन पवार, श्री. नितीन कोर, श्री. संजय पवार, इत्यादी शेतकरी वर्ग उपस्थित होते.
डॉ. अमोल विरकर
सहाय्यक प्राध्यापक, शासकीय कृषी महाविद्यालय, काष्टी, मालेगाव.
मोबाईल नंबर : ९८९०६७८२७५











No comments:
Post a Comment