पुणे पोलिसांचा दणका ! मोस्ट वाँटेड गुन्हेगार चित्रपट पाहताना अटकेत. - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Saturday, February 22, 2025

पुणे पोलिसांचा दणका ! मोस्ट वाँटेड गुन्हेगार चित्रपट पाहताना अटकेत.

 

        ("छावा" चित्रपट पाहण्यासाठी आले होते दोन सराईत गुन्हेगार)


पुणे : पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या धडाकेबाज कारवाईने गुन्हेगारी जगताला हादरवले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ६ पथकाने मकोका आणि दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोन कुख्यात गुन्हेगारांना हडपसर येथे रंगेहाथ पकडले.


चित्रपटगृहात गुन्हेगारांचा छुपा डाव उधळला!


गुन्हे शाखेच्या युनिट ६ पथकाला गुप्त माहिती मिळाली की, दिघी पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील दोन पाहिजे आरोपी वैभव टॉकीज, हडपसर येथे "छावा" चित्रपट पाहण्यासाठी आले आहेत. सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले.


अटक आरोपी:


1. धर्मेनसिंग ऊर्फ भगतसिंग ऊर्फ धरम्या सुरजितसिंग भादा (वय २२, रा. शिव कॉलनी नं. ०४, आदर्श नगर, दिघी, पुणे)

गुन्हा क्र. ३५५/२०२४

कलम: एन.डी.पी.एस. अॅक्ट, मकोका

2. बादशाहसिंग पोलादसिंग भोंड (वय २३, रा. शिव कॉलनी नं. ०४, आदर्श नगर, दिघी, पुणे)

गुन्हा क्र. ४९३/२०२४

कलम: भारतीय दंड संहिता, भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम


गुन्ह्यांची कबुली, पुढील तपास सुरू


पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत या दोघांनी अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याची कबुली दिली आहे. त्यांना दिघी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.


वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून कौतुकाची थाप


या धडाकेबाज कारवाईबद्दल अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजेंद्र मुळीक यांनी विशेष कौतुक केले आहे.ही उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, तसेच पोलीस अंमलदार नितीन मुंढे आणि कानिफनाथ कारखेले यांच्या पथकाने केली.


पुणे पोलिसांचा ठाम इशारा – गुन्हेगारांची जागा फक्त तुरुंगात!


या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले असून, पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्हेगारांना कोणतेही लपण्याचे ठिकाण सुरक्षित राहणार नाही, हे पुन्हा सिद्ध झाले आहे!



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here