शिवजयंतीनिमित्त मुस्लिम मावळ्यांकडून मिठाई वाटप कार्यक्रमाचे आयोजन. - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Saturday, February 22, 2025

शिवजयंतीनिमित्त मुस्लिम मावळ्यांकडून मिठाई वाटप कार्यक्रमाचे आयोजन.


सणसवाडी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुस्लिम मावळ्यांच्या वतीने सणसवाडी येथे मिठाई वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी माहेर संस्थेत होणार असून, गोरगरीब आणि वंचित बांधवांना मिठाई वाटप करून शिवजयंती उत्साहात साजरी केली जाणार आहे.

कार्यक्रमाचे मुख्य संयोजक रिजवान बागवान यांनी माहिती देताना सांगितले की, शिवराय हे संपूर्ण समाजासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांचा विचार सर्वधर्मीयांना एकत्र आणणारा आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त मुस्लिम मावळ्यांच्या वतीने हा उपक्रम राबवला जात आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहेर संस्थेच्या संस्थापिका मा. सि. लुसी कुरीयन असणार आहेत. तसेच, शिक्रापुर पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक दिपरतन गायकवाड यांच्या शुभहस्ते मिठाई वाटप होणार आहे.

मुख्य संयोजक रिजवान बागवान व मुस्लिम मावळ्यांनी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.






No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here