पारगाव प्रतिनिधी : नितिन गव्हाणे
पारगाव : ह. भ .प चौगुले महाराज यांच्या कन्येचा विवाह सोहळा २३ फेब्रुवारी २०२५ रोजी साईनाथ मंगल कार्यालय आधळगांव फाटा या ठिकाणी संपन्न होत आहे.चौगुले महाराज हे गोपाळ समाज कुटुंबातील असून त्यांचा पृर्वजात कुटुंबाचा वारकरी संप्रदायाशी कुठलाही संबंध नव्हता .
तरी चौगुले महाराज यांनी वारकरी संप्रदायाशी दृढ संबंध निर्माण करुन आज ते किर्तन, प्रवचन सेवा देत आहेत. कन्येच्या विवाह प्रसंगी त्यांनी दोनशे टाळकरी विनेकरी व पकवाद तसेच ह. भ .प विद्याताई महाराज जगताप कोळगाव डोळस यांचे किर्तन देखील आयोजित केले आहे.
या वेळी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले अलिकडे लग्न समारंभात अर्किस्ट्रा डान्स इतररञ कार्यक्रमाचे आयोजन केले जाते परंतु लग्न कार्यात किर्तन सेवा दिली जात नाही.
याच गोष्टीला मी फाटा देत कन्येच्या विवाह सोहळ्यात किर्तन सेवा देत आहे तसेच त्यांनी पुढे सांगितले की, लग्न का केले जाते आणि ते करुन काय केल पाहिजे याच गोष्टीचा समाजामध्ये प्रसार व्हावा म्हणून लग्न कार्यक्रमामध्ये किर्तन सेवेचे आयोजन केले आहे.







No comments:
Post a Comment