नवी दिल्ली : गेल्या चार दिवसांपासून सोन्याच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि गुंतवणूकदारांच्या वाढत्या विश्वासामुळे मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. त्यामुळे सोने झपाट्याने महाग होत आहे.
चार दिवसांत सोन्यात 2000 रुपयांची वाढ
या आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. सोमवारी 550 रुपये, मंगळवारी 330 रुपये, बुधवारी तब्बल 700 रुपये, तर गुरुवारी 400 रुपयांची वाढ झाली. एकूण चार दिवसांत सोन्याचा दर 2000 रुपयांनी वाढला आहे.
गुडरिटर्न्सनुसार,
- 22 कॅरेट सोन्याचा दर: 80,850 रुपये प्रति 10 ग्रॅम
- 24 कॅरेट सोन्याचा दर: 88,190 रुपये प्रति 10 ग्रॅम
सकाळच्या सत्रातही सोन्याच्या दरात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.
चांदी स्थिर, किंमत 1 लाखांच्या आसपास
चांदीच्या दरात मात्र मोठा बदल झालेला नाही. 5 आणि 14 फेब्रुवारी रोजी 1000 रुपयांची वाढ झाल्यानंतर चांदीचे दर स्थिर आहेत.
- एक किलो चांदीचा दर: 1,00,400 रुपये
IBJA नुसार सोन्याचे दर:
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार,
- 24 कॅरेट सोने: 86,520 रुपये
- 23 कॅरेट सोने: 86,174 रुपये
- 22 कॅरेट सोने: 79,252 रुपये
- 18 कॅरेट सोने: 64,890 रुपये
- 14 कॅरेट सोने: 50,614 रुपये
- एक किलो चांदी: 97,789 रुपये
किंमती का वाढत आहेत?
अमेरिकेच्या धोरणांमुळे जागतिक बाजारात अनिश्चितता वाढली आहे. गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे कल वाढवला आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याला चांगली मागणी आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कर आणि शुल्क नसते, तर सराफा बाजारात अतिरिक्त शुल्कामुळे किंमती वेगळ्या असतात.
सोन्याच्या किंमतीला ब्रेक केव्हा?
सोन्याच्या वाढत्या किंमती पाहता, गुंतवणूकदार आणि ग्राहक यांची चिंता वाढली आहे. पुढील काही दिवसांत बाजारातील स्थिती कशी राहते, यावर सोन्याच्या दराचा पुढील प्रवास ठरणार आहे.







No comments:
Post a Comment