राशीन देवीचा शतचंडी यज्ञ महोत्सवास आरंभ.. - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Friday, February 7, 2025

राशीन देवीचा शतचंडी यज्ञ महोत्सवास आरंभ..


 राशीन (प्रतिनिधी) - हलत्या दीपमाळासाठी प्रसिध्द असलेल्या व राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या राशीनच्या जगदंबादेवीच्या (यमाई तुकाई देवी) शतचंडी यज्ञास आरंभ झाला. हा महोत्सव एक आठवडा चालणार आहे. येत्या मंगळवारी (दि. ११) पूर्णाहुती होणार असून या दिवशी राज्यातून लाखो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

या शतचंडी महोत्सवाचा पार्श्वभूमीवर दोन किलोच्या सुवर्ण मुखवट्याची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. दरम्यान शतचंडी यज्ञाची देवीस महाअभिषेक करून मंत्रोच्चाराच्या गजरात सुरवात झाली. जगदंबा देवी सेवा संस्था आणि श्री जगदंबा देवी विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून दर

सात वर्षानंतर होणाऱ्या शतचंडी महोत्सवाची यंदा जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिराच्या कलशास सुवर्ण मुलामा देऊन कलशारोहण करण्यात आले असून, शिखराची रंगरंगोटी करण्यात आली आहे. मंगळवारी होत असलेल्या पूर्णाहुती सोहळ्यानंतर राशीनसह शेजारील बारा वाड्या आणि

राज्यातून उपस्थित राहणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचा आस्वाद घेता यावा यासाठी भक्तनिवासाच्या प्रांगणात भव्य अन्नपूर्णा मंडपाची उभारणी करण्यात आली आहे.

दरम्यान शतचंडीच्या पार्श्वभूमीवर आठवडाभर देवीची रोज महापूजा, सप्तशती पाठ, देवी भागवत कथा, सामुदायिक आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि. १०) देवीच्या दोन किलोच्या सुवर्ण मुखवट्याची प्रदक्षिणा मार्गावरून सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. शतचंडी महोत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी राशीनसह परिसरातील ग्रामस्थांनी आठवडाभर मांसाहार वर्ज्य केला असून संबंधित दुकाने आणि हॉटेल बंद ठेवण्यात आली आहेत.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here